नाशिकला पावसाने जोरदार झोडपले, गोदावरीला पूर स्थिती

godavari
Last Modified सोमवार, 7 ऑक्टोबर 2019 (08:48 IST)
नाशिक : शहरासह जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने पुन्हा हजीरी लावल्याने नाशिकार्रांची तारांबळ उडाली. विशेष म्हणजे धरण पान्लोट क्षेत्रात पौसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरणातून सायंकाळी साडे सहा वाजे नंतर २२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. त्याच सोबत जिल्ह्यातील इगतपुरी पेठ तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे दारणा धरणातून ५५० क्युसेक पाण्याचा विसर्गग सोडण्यात आला आहे. दरम्यान, गोदा घाट लागत असलेला सराफ बाजार, दहीपूल, गाडगेमहाराज पूल, गणेशवाडी भाजी मंडई व इतर परिसरात पाणी शिरले आहे.
रविवारी दुपारी शहरामध्ये सुमारे सव्वा तासात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. नवरात्रीनिमित्त शहरात होत असलेले पुजाविधी तसेच सुट्टीचा दिवस असल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या आनंदावर यामुळे पाणी फेरले गेले. शहरात दुपारी चार वाजेनंतर पावसाने जोरदार बॅटिंग केली. यामुळे रविवार पेठ, मेनरोड, दहीपूल, सराफ बाजार या बाजारपेठांमध्ये तसेच राजीव गांधी भवनासमोर शरणपूर रस्त्यापासून ते गावठाणमधील जुने नाशिक भागातील रस्त्यापर्यंत पाण्याचे पाट वाहत होते. काही ठिकाणी गटारीही उफाळून आल्या होत्या. शहरातील सर्व उपनगरे या भागात जोरदार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे नासर्डी तसेच गोदावरीची पातळी देखील वाढली. दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास शहर व परिसरात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला, चार वाजता जोरदार तरी अवघ्या सव्वा तासात शहर व परिसरात पावसाने धुमशान केलं. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने शहरातील रस्ते पुन्हा गजबजले.
दरम्यान, दुपारनंतर सुरु झालेल्या दमदार पावसामुळे जुने नाशकातील अनेक सकल भाग पाण्या खाली गेले. सराफ बाजार, गणेशवाडी भाजी मंडई, रामकुंड व इतर परिसरात पुराचे पाणी शिरले. विशेष म्हणजे दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास शहरात विजांचा कडकडाट अँड ढगांच्या गडगडाटासह अवघ्या दोनच तासात ४०.८ मीमी पासची नोंद झाली. पावसामुळे कालिका मातेच्या यात्रेत दर्शनासाठी आलेल्या भिविकांची तारांबळ उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी भाविकांनी मंदिर परिसर व जवळच्या इमारतींना मध्ये शरण घेतली. दरम्यान मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

पूर्ण जबाबदारी पोलिसांवर विश्वासाने टाकूया ते जे काही चौकशी ...

पूर्ण जबाबदारी पोलिसांवर विश्वासाने टाकूया ते जे काही चौकशी करतील : सुप्रिया सुळे
“सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यावर अनेक ट्विस्ट त्यात आले आहेत. ...

रत्नागिरीत मृत पक्षी आढळले, कोल्हापुरात महानगर पालिका ...

रत्नागिरीत मृत पक्षी आढळले,  कोल्हापुरात महानगर पालिका यंत्रणा सतर्क
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात अचानक मृत पक्षी आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...

बीडच्या आंबेजोगाई तालुक्यातही बर्ड फ्लू

बीडच्या आंबेजोगाई तालुक्यातही बर्ड फ्लू
बीड जिल्ह्यातीलआंबेजोगाई तालुक्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. लोखंडी गावातील ...

औरंगाबादच्या नामांतरणावर आदित्य ठाकरे यांच सूचक विधान

औरंगाबादच्या नामांतरणावर आदित्य ठाकरे यांच सूचक विधान
औरंगाबादच्या नामांतरणाच्या वादावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत मोठं ...

नैतिकतेच्या मुद्या वरून तरी धनंजय मुंडे राजीनामा देणार की ...

नैतिकतेच्या मुद्या वरून तरी धनंजय मुंडे राजीनामा देणार की नाही, चंद्रकांत पाटील यांचा सवाल
राज्याचे समाजिक न्याय राज्यमंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्दावर राजीनामा द्यावा. ...