मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अधिकमास
Written By
Last Modified: शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (12:45 IST)

अधिक महिन्याचा एकादशीला या 10 वस्तू दान कराव्या

Adhik Maas Ekadashi Daan
अधिक महिन्याच्या एकादशीला हे देणगी देणं आवश्यक आहे -
 
1 तूप - सौख्य आणि समृद्धी साठी.
 
2 कापूर - घरात शांती साठी.
 
3 केसर - नकारात्मकता दूर करण्यासाठी.
 
4 कच्चे हरभरे - व्यवसाय किंवा नोकरीमध्ये बढती साठी.
 
5 गूळ - धन आगमनासाठी.
 
6 तूर डाळ - वैवाहिक अडथळे दूर करण्यासाठी.
 
7 मालपुआ - दारिद्र्य दूर करण्यासाठी. 
 
8 खीर - ग्रहांच्या दुष्प्रभावाला दूर करण्यासाठी.
 
9 दही - शारीरिक आजारांपासून आराम मिळण्यासाठी.
 
10 तांदूळ - कामामधील अडथळे दूर करण्यासाठी.
 
 
अधिक महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो. अधिक मासाला पुरुषोत्तम मास देखील म्हणतात. त्या मागील कारण असे की या महिन्याचे आराध्य देव श्रीविष्णू आहे.
 
अधिक महिन्यात पूजा -उपासना करणं आणि देणगी देणं चांगले मानले जाते. असे केल्यास 10 पटीने चांगले फळ मिळतं. एकादशीला देणगी देणं हे पुण्याचं काम आहे. अशी आख्यायिका आहे की जे कोणी अधिक महिन्याच्या एकादशीला काही विशिष्ट वस्तुंना देणगी स्वरूपात देतं, त्याचे सर्व त्रास स्वतः श्री विष्णू भगवान दूर करतात. आणि त्यांचा सर्व मनोकामना पूर्ण करतात. आणि त्याच बरोबर त्यांचे घर नेहमी अन्न आणि धनाने भरलेलं असतं.
 
देणगी देण्याचं चांगले फळ -
* दारिद्र्य दूर होतं.
* असाध्य रोग आणि आजार बरे होतात.
* कर्जापासून सुटका होते.
* सर्व समस्या सुटतात आणि आश्चर्यकारक फळ मिळतात.
* घरात भरभराटी येते.