मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2021
Written By
Last Modified: गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (23:45 IST)

दैनिक राशीफल 24.09.2021

मेष : मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल. आज धन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धन संचय करायचे आहे तर, तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा माता-पिता सोबत बोला. मित्रांकडून अपेक्षेपेक्षा अधिक आधार मिळू शकेल. 
वृषभ : तुमचा जोडीदार तुमच्याकडून थोडा वेळ मागतो परंतु, तुम्ही त्यांना वेळ देऊ शकत नाही त्यामुळे तो नाराज होईल. आज त्यांची ही खिन्नता स्पष्टतेने समोर येऊ शकते. या सप्ताहात तुम्ही बरेच काही करण्याची इच्छा ठेवतात परंतु, जर तुम्ही काम टाळत राहाल तर, स्वतःवरच ओझे करून घ्याल.
मिथुन : उच्च कॅलरी असणारा आहार टाळा, आपल्या व्यायामाबद्दल आपुलकी, प्रामाणिकपणा असू द्या. धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे कारण, तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्‍न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका.
कर्क : तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. दिवसाची सुरवात जरी थोडी थकणारी राहील परंतु, जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही जवळच्या व्यक्तीसोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकतात. आयुष्य तुम्हाला चांगल्या गोष्टींचे ही अनुभव देते परंतु, तुम्हाला फक्त या अनुभवांना समजण्याची आवश्यकता आहे.
सिंह : आपल्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवा, त्यामुळे आपल्या एकांतवास आणि एकटेपणावर मात करता येईल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. 
कन्या : प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरुप येईल. विद्यार्थी विद्यार्थिनी आज आपल्या किमती वेळेचा दुरुपयोग करू शकतात. तुम्ही मोबाइल किंवा टीव्हीवर आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवू शकतात. कुठल्या ही कामाला करण्याच्या आधी हे जाणून घ्या की, याचा परिणाम तुमच्यावर कसा पडेल.
तुला : कार्यालयात तसेच घरी असलेल्या तणावांमुळे तुम्ही किंचित चिडचिडे बनाल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. 
वृश्चिक : जेव्हा तुम्हाला जाणवते की, तुमच्याजवळ कुटुंबियांसाठी आणि आपल्या मित्रांसाठी वेळ नाही तर, तुम्ही दुःखी व्हाल. आज ही तुमची मनस्थिती अशीच राहू शकते. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल.
धनू : मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. इतर अनेक लोक तुम्हाला नवी स्वप्ने आणि आशा दाखवतील मात्र आपल्या प्रयत्नांवर बरेच काही अवलंबून असेल. वैयक्तीक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील.
मकर : या राशीतील जातक आज लोकांशी भेटण्यापेक्षा एकट्यात वेळ घालवणे अधिक पसंत करतील. आज तुमचा रिकामा वेळ घरातील सफाई करण्यात व्यतीत होऊ शकतो. दिवसाची सुरवात उत्तम राहील आणि म्हणून आज पूर्ण दिवस तुम्हाला उर्जावान वाटेल.
कुंभ : आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो. तुमच्या बायकोच्या कामकाज हस्तक्षेप केल्याने ती अस्वस्थ होईल. गैरसमज टाळण्यासाठी हस्तक्षेप करण्यापूर्वी एकदा बायकोची परवानगी घ्या.
मीन : मग तुम्ही सहजपणे समस्या टाळू शकाल. तुम्ही रिकाम्या वेळचा योग्य उपयोग करण्यासाठी तुम्ही आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकतात. नातेवाईकांमध्ये वादाची ठिणगी पडणे शक्य आहे, परंतु संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होईल. आज अचानक तब्बेत खराब होऊ शकते ज्यामुळे तुम्ही पूर्ण दिवस चिंतेत राहू शकतात.