शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2021
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 डिसेंबर 2020 (07:19 IST)

लग्न राशीनुसार 2021 साठी भविष्यफळ आणि खास उपाय जाणून घ्या

पं. अशोक पँवार 'मयंक' 

मेष लग्नासाठी 2021 हे वर्ष कसे जाणार जाणून घेऊ या - 
वर्ष 2021 मध्ये या लग्नाच्या लोकांमध्ये एक नवी ऊर्जा असेल. पराक्रमात वाढ होईल. आपण आपल्या सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात सक्षम असाल. सन्मानाच्या दृष्टीने बघितले तर हे वर्ष चांगलेच जाईल. आईची काळजी होऊ शकते. कौटुंबिक बाबतीत काळजी घ्यावी लागेल. जमीन जुमल्याच्या व्यवहाराच्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे. वैवाहिक जीवनात संमिश्रण परिस्थिती राहील. पैशाच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. अविवाहित लोकांसाठी वेळ चांगली नाही. प्रेम विवाह अजिबात करू नये. व्यवसायाच्या दृष्टीने एकंदरीत हे वर्ष ठीक आहे. 
 
नोकरदार वर्गासाठी वातावरण सुखद राहील. सरकारी कामात स्थिती अनुकूल राहील. बाहेरच्या वातावरणात स्थिती संमिश्र राहील. प्रवासाच्या दृष्टीने काळजी घ्यावी लागेल. नशिबाच्या जोरावर स्थिती अनुकूल बनेल, त्यामुळे महत्त्वाचे कामे होतील. वडिलांचे सहकार्य मिळेल. कुटुंबाच्या सदस्यांच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. बोलण्यावर ताबा ठेवा. दैनंदिन व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. स्त्रीपक्ष सहकार्य करतील. राजकीय पक्षातील लोकांना फायदासह सहकार्य लाभेल. शत्रू पक्ष परास्त होईल. आरोग्याच्या दृष्टीने वेळ चांगली आहे.

उपाय - कपाळावर शेंदुराचा टिळा लावा. भैरवची पूजा करा. लाल तोंडाच्या माकडांना गूळ आणि हरभरे खायला द्या.
 
****************

वृषभ लग्नासाठी 2021 हे वर्ष कसे जाणार जाणून घेऊ या - 
वृषभ लग्नाच्या लोकांसाठी हे वर्ष उत्साही असण्यासह अपेक्षित यशासाठीचे आहे. आपण नशीबवान राहाल. या लोकांची धार्मिक वृत्ती राहील. तसेच महत्त्वाच्या कामात वडिलांचे सहकार्य देखील मिळेल. आपण आपली कृती अंमलबजावणी करण्यापूर्वी कोणालाही सांगू नका. अविवाहितांसाठी विवाह योग जुळून येतील. कुटुंबाच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. पराक्रमात वाढ होईल. आर्थिक प्रयत्न यशस्वी होतील. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. कर्ज कमी होतील. न्यायालयीन खटले यशस्वी होण्याचे योग अधिक आहे. स्त्री पक्षाच्या बाबतीत अनुकूल स्थिती आहे. वैवाहिक आयुष्यात गोडवा राहील. शत्रू परास्त होईल. प्रवास घडतील. विध्यार्थी वर्गाने सावधगिरी बाळगावी. आरोग्याच्या दृष्टीने वेळ ठीक आहे. आपल्या मान सन्मानात वाढ होईल. भागीदारीच्या कामात यश मिळेल. स्थावर राजकारणाशी संबंधित लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल. व्यवसायाच्या दृष्टीने सर्व समस्यांवर तोडगा निघेल त्यामुळे आपण काळजी मुक्त व्हाल. 
नोकरदार वर्गाला हे वर्ष फायदेशीर आहे. ज्यांना नोकरी नाही त्यांना देखील नोकरी मिळेल. सौंदर्याकडे कल वाढेल. प्रेम प्रकरणांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आईच्या आरोग्याची काळजी असू शकते. 

उपाय- या वर्षी नीलम घालणे फायदेशीर ठरेल. दर शनिवारी जमिनीवर 1 चमचा तिळीचे तेल टाका.
 
*****************
 
मिथुन लग्नासाठी 2021 हे वर्ष कसे जाणार जाणून घेऊ या - 
हे वर्ष या लग्नाच्या लोकांसाठी बऱ्याच भेटवस्तू घेऊन आला आहे. आपले सर्व कामे होतील. आपला प्रभाव वाढेल. दांपत्य जीवनात गोडवा घेऊन येईल. आर्थिक क्षेत्रात स्थिती चांगली राहील त्यामुळे फायद्याचे मार्ग प्रशस्त होतील. कौटुंबिक बाबतीत सहकार्यात्मक स्थिती बनेल. चैनीच्या गोष्टींसाठी खर्च होतील. बाह्य संपर्कातून आशादायक परिस्थिती बनेल. कोणत्याही महत्त्वपूर्ण कामानिमित्त प्रवासाचे योग बनतील. जे आपल्यासाठी फायद्याचे राहतील. शत्रू पक्षावर आपले प्रभुत्व राहील. त्यांचे सर्व कट नाकाम होतील. व्यवसायासाठी वेळ अनुकूल राहील. अधिकारी वर्गासाठी ही वेळ सहकाराची असेल. नशिबात अडथळे येतील नंतर यशाची प्राप्ती होईल. पराक्रमात चढ-उतार राहील. भावंडांचे सहकार्य लाभतील. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागणार. आर्थिक बचत कमी होईल पण कोणतेही काम थांबणार नाही. मुलांच्या बाबतीत सहयोगात्मक स्थिती राहील.विध्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे.कुटुंबाचे सहकार्य प्रशंसनीय राहील. नोकरीची शोध असणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. नोकरदार वर्गासाठी अधिकाऱ्यांचा आणि सहकाऱ्यांचा अपेक्षित सहकार्य मिळेल. नवीन कार्ययोजना बनतील पण त्याला विचारपूर्वक अमलात आणाव्यात. लहान भाऊ-बहिणीचे सहकार्य मिळेल. अविवाहितांसाठी हा काळ समिश्रित आहे. धर्म कार्या मध्ये विश्वास राहील घरात शुभ कार्ये होतील. 
 
उपाय - कोणत्याही कामात अडथळे बघाल तर काळे उडीद काळ्या कपड्यात बांधून 9 शनिवारी कोणत्याही शनी मंदिरात ठेवून या. शक्य असल्यास कोणत्याही शुक्लपक्षाच्या बुधवारी 5 रत्तीचा पाचू(पन्ना) घाला.
 
*****************
 
कर्क लग्नासाठी 2021 हे वर्ष कसे जाणार जाणून घेऊ या-
कर्क लग्नाच्या लोकांसाठी हे वर्ष सुखाचे आणि मनाला आनंद देणारे आहे. मान सन्मानात वाढ होईल. विचार केलेल्या कार्यात यश मिळण्याचे योग आहे. कामात परिश्रम करावे लागतील तरच यश मिळेल.व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल असल्यानं यश मिळेल. कौटुंबिक दृष्टीने वेळ मिश्रित आहे.सार्वजनिक कार्यात यश मिळेल. विद्यार्थी वर्गासाठी काळ सहयोगी आहे. मुलांच्या संदर्भात स्थिती अनुकूल असून आणि चांगली बातमी मिळेल. आर्थिक बचत कमी होईल. पण काम थांबणार नाही. कुटुंबातील सदस्याचे सहयोग मिळतील. त्यामुळे आपल्याला आराम मिळेल. शत्रू पक्षावर प्रभुत्व राहील. कर्जाची परिस्थितीत सुधारणा होईल. राजकारणातील लोकांना परिस्थिती अनुकूल राहील त्यामुळे फायदा मिळेल. घरात काही शुभ कार्ये घडतील. वडिलांचे सहकार्य मिळतील. प्रवासाच्या पूर्वी आपल्या सामानाला व्यवस्थित ठेवा जेणे करून आपल्याला काही त्रास होऊ नये. या वर्षी परदेशी प्रवासाचे योग कमी आहे.आध्यात्मकते कडे कल राहील. दैनंदिन आयुष्यातील समस्या सुटतील. अविवाहितांसाठी वेळ अनुकूल असल्यामुळे विवाहाचे योग जुळून येतील. विवाहित लोकांचे जीवन देखील सुखकर राहील. जोडीदारां कडून फायदा मिळू शकतो. जमिनी मालमत्तेच्या बाबतीत समाधान कारक स्थिती राहिली. आर्थिक बाबतीत अनुकूल वातावरण राहील.
 
उपाय - या वर्षी पुष्कराज सह मून स्टोन गुरुवारच्या दिवशी शुभ किंवा अमृत चौघड्यांत घालावे. फायदा मिळेल. दर सोमवारी 1 चमचा दही अंघोळीच्या पाण्यात घालून अंघोळ करा.
 

*************************** 

सिंह लग्नासाठी 2021 हे वर्ष कसे जाणार जाणून घेऊ या -
या वर्षी सिंह लग्न असणाऱ्यांचे जणू नशीब उजळून निघेल. धर्म क्षेत्रात आपला विश्वास वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने वेळ चांगला आहे. जमीन आणि घराशी निगडित अडचणी दूर होतील. कौटुंबिक दृष्टीने खर्च व पूर्ती होईल. विध्यार्थी वर्गासाठी वेळ अनुकूल असल्यामुळे आनंद होईल. व्यवसायाच्या दृष्टीने आनंदी वातावरण आहे. नोकरदार वर्गासाठी आनंदी वातावरण आहे. विचार केलेले सर्व कामे परिश्रम केल्याने पूर्ण होतील. राजकारणाशी निगडित लोकांसाठी यशाचा काळ आहे. अधिकारी वर्ग आपल्या कौशल्यतेमुळे फायदा मिळवतील. मुलांच्या बाबतीत सहकार्याचा काळ आहे. या वर्षी अपत्य प्राप्तीचा योग देखील आहे. अविवाहितांसाठी विवाहाचे योग आहे. शत्रू पक्षाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल आहे. कोर्टाचा निकाल आपल्या पक्षात लागेल. भागीदारीच्या बाबतीत संमिश्र स्थिती असल्यामुळे विचार करून काम करा. प्रवासात सावधगिरी बाळगा. सामाजिक कार्यात प्रयत्नामुळे यश मिळेल. प्रभावी व्यक्तिमत्त्व राहील. महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे आराम मिळेल. वाणीचा प्रभाव चांगला झाल्यामुळे कार्ये सुरळीत होतील. कर्जे कमी होतील. आर्थिक प्रयत्नात यश मिळेल. लहान भावंडांचे सहकार्य मिळेल. अधिक परिश्रम केल्याने तणावाची स्थिती उद्भवू शकते. मित्र वर्गाकडून देखील सहकार्य मिळेल त्यामुळे आनंद होईल. महिला वर्गाच्या बाबतीत संमिश्र स्थिती आहे. नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी मिळेल. रखडलेली कामे होतील.

उपाय - या वर्षी मूंगा घालणे चांगले राहील. माणिक देखील घालू शकता. पुष्कराज किंवा पुखराज 5 रत्तीचे गळ्यात घालणे देखील अधिक फायदेशीर ठरेल.
 
******************

कन्या लग्नासाठी 2021 हे वर्ष कसे जाणार जाणून घेऊ या-
कौटुंबिक प्रकरणांमध्ये आनंददायी वातावरण आहे. मातृपक्षा कडून सहकार्य मिळाल्यामुळे आनंद होईल. जमिनीशी निगडित कामात स्थिती अनुकूल राहील. एखादे महत्त्वाचे काम झाल्यामुळे उत्साहात वाढ होईल. स्थानीय राजकारणाशी संबंधित लोकांसाठी वेळ फायद्याची आहे. नशिबाची साथ मिळाल्याने रखडलेली कामे पूर्ण होतील.वडिलांची साथ मिळेल जी अनुकूल आहे.विद्यार्थी वर्गासाठी वातावरण आनंदी आहे. मुलांमध्ये आनंदी वातावरण राहील. लिखाण संबंधी कामात यशाची प्राप्ती होईल. घरात किंवा कुटुंबात शुभ कार्य होतील. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. अविवाहित लोकांना आनंदाची बातमी मिळेल. मोठे भावंडं सहकार्य करतील त्यामुळे आराम मिळेल. भागीदारीच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आर्थिक दृष्टीने सावधगिरी बाळगावी लागेल. जोखीमच्या बाबतीत सावध राहा. वाणी वर ताबा ठेवा. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य समिश्रित मिळेल. व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल स्थिती असल्याने आनंदाचे वातावरण राहील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळेल. नोकरदार वर्गांना कामात अनुकूल स्थिती बनून बढतीचे योग येतील. शत्रू पक्ष वर प्रभुत्व राहील. सामाजिक कामात व्यस्ततेसह खर्च होईल. धार्मिक बाबतीत स्थिती चांगली राहील. पैशाच्या व्यवहारात खबरदारी घ्या. पैसे उसने देताना सावधगिरी बाळगा.वाहन काळजीपूर्वक चालवा.
 
उपाय - या वर्षी आपण एखाद्या योग्य ज्योतिषाला पत्रिका दाखवून नीलम घाला. पाच रत्तीचा पाचू (पन्ना)देखील आपण बुधवारी घालू शकता. 1 वाटी साखर भरून लक्ष्मीच्या मंदिरात शुक्रवारच्या दिवशी ठेवून या.
 
*****************

तूळ लग्नासाठी 2021 हे वर्ष कसे जाणार जाणून घेऊ या -
तूळ लग्नाच्या लोकांसाठी हे वर्ष बरेच काही घेऊन आले आहे. कौटुंबिक बाबतीत आनंदी वातावरण राहील. घर आणि जमिनीशी निगडित कामे होतील. जे लोक प्रॉपर्टीच्या व्यवसायाशी जुडलेले आहे त्यांना फायदा होईल. विवाहित लोकांसाठी हे वर्ष आनंदी आहे. अविवाहित लोकांसाठी वेळ चांगला आहे लग्नाचे योग येतील. व्यवसायाच्या दृष्टीने सावधगिरी बाळगावी. अधिकारी वर्गाच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल. नोकरदार वर्गाला वेळ सामिश्रित आहे. नोकरीच्या शोधात असाल तर प्रयत्न केले तर यश मिळेल. शत्रू पक्ष वर प्रभुत्व मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने वेळ चांगला आहे प्रभाव वाढेल. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यामुळे आनंदी वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक दृष्टया पराक्रमातून इच्छित यश मिळवाल. मोठ्या भावंडांचे सहकार्य मिळाल्याने फायदा होईल. या वर्षी नशीब उजळेल. वडिलांची साथ मिळेल. गूढ विद्यांकडे कल राहील.इष्ट मित्रांचे सहकार्य मिळेल. रोमांस साठी वेळ सामान्य आहे.आर्थिक बचत कमी होईल. पैशाशी निगडित समस्या दूर होईल. विद्यार्थ्यांसाठी वेळ चांगला आहे. दैनंदिन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना आर्थिक लाभ मिळतील. मागील सर्व समस्यां पासून मुक्ती मिळाल्याने आनंदासह उत्साह वाढेल. 

उपाय - या वर्षी आपण बुधवारी 5 रत्तीचे पाचू घाला. शनीची कृपा मिळविण्यासाठी तिळाचे तेल शनिवारच्या दिवशी जमिनीवर घाला. वयोवृद्धांना उडीद डाळ पासून बनलेले खाद्य पदार्थ आणि पोळी खाऊ घाला.   
 
******************

वृश्चिक लग्नासाठी 2021 हे वर्ष कसे जाणार जाणून घेऊ या- 
साहस पराक्रमात वाढ होईल. सहकार्य मिळेल, व्यावसायिकांसाठी फायद्याची स्थिती बनेल. दांपत्य जीवनात स्थिती चांगली राहील. जोडीदारापासून लाभ मिळेल. अविवाहितांसाठी वेळ चांगली आहे. बाहेरच्या लोकांशी संपर्क करणे फायद्याचे ठरेल. परदेश जाणाऱ्यांसाठी या वर्षात परदेशगमन करण्याची शक्यता अधिक आहे. विद्यार्थी वर्गासाठी वेळ चांगला आहे. मुलांच्या बाबतीत महत्त्वाचे कामे होतील. भागीदारीच्या बाबतीत स्थिती अनुकूल आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल. धर्म-कार्यात कल वाढेल. आर्थिक बचतीचे योग बनतील. कौटुंबिक बाबतीत सहकार्यांसह फायदे मिळतील. वाणी चातुर्याचा फायदा होईल. राजकारणात निगडित असलेल्या लोकांना अनुकूल यशःप्राप्तीचे योग आहे. कौटुंबिक बाबतीत स्थिती अनुकूल असण्यासह घरात काही शुभ कार्ये होतील. घर आणि जमिनीशी जुडलेले कामे पूर्ण होतील. शत्रुपक्ष परास्त होतील. न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळेल. नोकरदार वर्गाला काही चांगल्या बातम्या मिळतील. नोकरी शोधणाऱ्यांना नोकरी मिळेल. संचारच्या माध्यमातून शुभ वार्ता ऐकू येईल. अधिकारी वर्गासाठी आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याच्या दृष्टीने वेळ चांगली म्हणता येईल. नशीब चांगले राहील. आपण आपला हट्टीपणा सोडला तर इच्छित कामात यशःप्राप्ती होण्याची शक्यता आहे.
 
उपाय - या वर्षी आपण पुष्कराजचे लॉकेट बनवून  गुरुवारी गळ्यात घालावे. राजकारणात यश मिळवायचे असल्यास रविवारी करंगळीत माणिकची अंगठी बनवून घाला.
 

******************** 

धनु लग्नासाठी 2021 हे वर्ष कसे जाणार जाणून घेऊ या- 
नशिबाच्या दृष्टीने हे वर्ष खूप चांगले आहे. संपूर्ण वर्षात नशिबाची साथ मिळेल. महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी  सक्षम असाल. मागील सर्व अडचणी दूर होतील. नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी मिळेल. व्यावसायिक आहात तर व्यवसायात प्रगतीसह फायदे मिळतील. राजकारणाशी निगडित लोकांना स्थिती अनुकूल राहील. मुलांच्या बाबतीत काही काळजी असल्यास काळजी दूर होईल. विद्यार्थी वर्गासाठी वेळ अनुकूल आहे. व्रक्तुत्व स्पर्धेत भाग घेतल्यास यश मिळेल. करमणुकीच्या संसाधनात वाढ आणि खर्च होईल. दांपत्य जीवनातील अडथळे दूर होऊन आपसातील प्रेम वाढेल. दैनंदिन व्यवसायाशी निगडित असलेल्या लोकांना आनंद मिळेल. अविवाहितांचे लग्नाचे योग जुळून येतील. वाणीचा प्रभाव चांगला पडेल त्यामुळे बऱ्याच कामात यश मिळेल. या वर्षात एखाद्या नदी किंवा तलावाकडे जाऊ नका. प्रवासात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आवश्यक असेल तरच प्रवास करा. बाहेरच्या व्यक्तीशी पैशाचा व्यवहार करताना काळजी घ्या सावधगिरी बाळगा. आरोग्याची काळजी घेतल्याने धोक्याला टाळता येईल. आर्थिक दृष्टया हे वर्ष खूप काही घेऊन आले आहे. आर्थिक समस्या सुटतील. मोठ्या भावांचे सहकार्य मिळेल कौटुंबिक कामात व्यस्तता वाढेल. घरात काही शुभ कार्ये होतील. इष्ट मित्रांचे सहकार्य लाभतील. भागीदारीच्या कार्यात अनुकूल परिस्थिती असल्याने यशःप्राप्ती होईल. एखादी चांगली आनंदाची बातमी मिळेल.

उपाय - पुष्कराज लॉकेटच्या स्वरूपात घालणे फायदेशीर आणि शुभ असेल. हळदीचे टिळक लावावे. दर गुरुवारी  गायीला 5 केळी खाऊ घाला.
 
********************

मकर लग्नासाठी 2021 हे वर्ष कसे जाणार जाणून घेऊ या - 
मकर लग्नाच्या लोकांसाठी एक नवा सूर्य उगत आहे आपल्या कामात येणाऱ्या अडथळ्यांपासून  मुक्ती मिळेल, तसेच आपण महत्त्वाच्या कामात देखील यश मिळवाल. यंदाच्या वर्षी या लग्नाच्या लोकांसाठी पंचमहापुरुष योगापैकी एक योग शश बनत आहे त्यामुळे आपली सर्व भरपाई होईल. मनाला आनंदाची अनुभूती मिळेल. दैनंदिन व्यवसाय करणाऱ्यांना महत्त्वाची यशःप्राप्ती होऊन फायद्याची स्थिती आहे. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. अविवाहितांसाठी चांगला वेळ आहे. विवाहितांना जोडीदारांकडून फायदा मिळेल. आर्थिक समस्या सुटतील. उत्पन्नाचे साधने मिळतील. मुलांच्या बाबतीत वेळ समिश्रित आहे. विद्यार्थी वर्गासाठी वेळ साधारण आहे.घर आणि जमिनीशी निगडित समस्यांचे समाधान मिळेल. स्थानिक राजकारणाशी जुडलेल्या लोकांना फायद्याची स्थिती आहे. करमणुकीच्या संसाधनांवर खर्च होईल. जनतेशी निगडित कामात यश मिळेल. नोकरदार वर्गाला आपल्या विवेकबुद्धीनुसार अनुकूलता मिळेल.बाहेरच्या व्यवहारात सहकार्यांसह आनंददायक स्थिती आहे. शेअर बाजाराशी निगडित असणाऱ्या लोकांना खबरदारी घ्यावी लागेल. लहान भावंडांवर खर्च करावे लागेल. पराक्रमात वाढ होईल आणि सहकाराची स्थिती बनेल. भागीदारीच्या बाबतीत कामाची स्थिती अनुकूल राहील. या वर्षात नशीब आपल्या पक्षात राहील. परदेशी प्रवास या वर्षी पूर्ण होतील. शत्रू पक्षावर प्रभुत्व राहील. आरोग्याच्या दृष्टीने वेळ आनंददायी राहील.
 
उपाय - या वर्षी आपण नीलम घालून फायदे मिळवू शकता. जमिनीवर 1 चमचा तिळाचे तेल दर शनिवारी घाला. वृद्ध लोकांना शनिवारच्या दिवशी ब्लँकेट दान करा. उडदाचे वरण बनवून गरीबां मध्ये वाटा.   
 
**********************

कुंभ लग्नासाठी 2021 हे वर्ष कसे जाणार जाणून घेऊ या- 
कुंभ लग्नाच्या लोकांसाठी हे वर्ष आनंदाचा वर्षाव घेऊनच आला आहे. परदेश जाण्याच्या इच्छुक लोकांसाठी या वर्षी परदेश गमनाचे योग आहे. बाहेरच्या लोकांशी संपर्क अनुकूल राहील. आर्थिक बचतीचे योग आहे. कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळाल्यामुळे आनंद होईल. शत्रुपक्षावर प्रभुत्व राहील. कर्जाच्या स्थितीत सुधार होईल. न्यायायलीन खटल्यांचा निर्णय आपल्या पक्षात होतील. नशिबात वाढ होईल आणि  ग्रहांचे देखील साथ मिळाल्याने आराम मिळेल. कौटुंबिक वेळ चांगला आहे. घर आणि जमिनीशी निगडित फायदा होण्याचे योग जुळून येण्याची शक्यता आहे. भावंडांचे सहकार्य मिळतील. संचारच्या माध्यमातून काही आनंदाची बातमी मिळेल. भागीदारीच्या दृष्टीने अनुकूल यशाची प्राप्ती होईल. व्यापार व्यवसायाशी निगडित असलेल्या लोकांना हे वर्ष प्रगतिकारक ठरेल. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. दांपत्य जीवनात गोडवा राहील. या वर्षात जोडीदाराकडून फायदे मिळण्याचे योग संभवतात. दैनंदिन व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष फायदेशीर आहे. वडिलांच्या आरोग्याची काळजी दूर होईल. सन्मानात वाढ होईल. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. विद्यार्थी वर्गासाठी हा वेळ उत्तम आहे. व्रक्तुत्व स्पर्धेत यश मिळतील. नोकरीचा शोध घेणाऱ्यांना हे वर्ष शुभ असून चांगली नोकरी मिळण्याच्या संधी येतील. प्रेम विवाहाचे योग आहे पण समजूतदारीने निर्णय घ्या. धर्म-कार्यांकडे कल राहील. वडिलधाऱ्यांचे आदर करणेच आपल्यासाठी आशीर्वाद आहे. पैशाच्या व्यवहाराच्या बाबतीत समजूतदारीने निर्णय घ्यावे लागेल.
 
उपाय- या वर्षी गळ्यात 3 रत्ती पेक्षा जास्तीचे नीलमरत्न चांदीत बनवून शनिवारी शुभ किंवा लाभ चौघड्यात घालावे. किमान 9 शुक्रवारी कुमारिकांना खीर खाऊ घाला. 
    
*********************

मीन लग्नासाठी 2021 हे वर्ष कसे जाणार जाणून घेऊ या- 
या वर्षी संमिश्रण फळ मिळणार आहे. पराक्रमात वाढ होईल. मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळाल्यामुळे महत्त्वाचे कामे होतील. कौटुंबिक वेळ चांगला आणि आनंदात जाईल. घरात काही शुभ कार्ये होतील. मुलांच्या बाबतीत सर्व कार्ये झाल्याने आनंदाचे वातावरण बनतील. विद्यार्थी वर्गासाठी आनंदाचे वातावरण राहील. मानसिक ताण दूर होतील. व्यवसायाच्या दृष्टीने प्रगतिकारक स्थिती राहील. अधिकारी वर्गासाठी सहकाराचा काळ आहे. नोकरदार वर्गाला हा काळ अनुकूल असल्याने आनंद मिळेल. आर्थिक दृष्टीने हा काळ अनुकूल राहील तसेच उत्पन्नाच्या प्राप्तीचे नवे मार्ग उघडतील. दांपत्य जीवनात गोडवा राहील, दैनंदिन व्यवसायात सहकार्य मिळेल. नशिबाच्या जोरावर आपले सर्व कामे होतील तसेच कौटुंबियांचे सहकार्य  मिळेल. आपल्या गोड बोलण्याने सर्व कामे मिळविण्यात सक्षम राहाल. समस्या सुटतील. भागीदारीच्या कामात सावधगिरी बाळगा. चैनीच्या गोष्टींसाठी खर्च अधिक होईल. राजकारणातील लोकांना काळ अनुकूल असल्याने इच्छित कामात यश मिळेल. महत्त्वाच्या कामासाठी प्रवासाचे योग घडतील. अविवाहितांचे लग्न होतील. शत्रू पक्षावर प्रभुत्व राहील. न्यायायलीन प्रकरणात यश मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने वेळ चांगली आहे. पैशाच्या व्यवहारात खबरदारी घ्या. एखाद्या जोखीम च्या कामात गुंतवणूक करणे टाळावे. शेअर बाजारात सावधगिरी बाळगा.
 
उपाय - 5 रत्तीचा पुष्कराज चांदीमध्ये लॉकेट बनवून गुरुवारी किंवा शुभ आणि लाभ चौघड्यांत घाला. गुरुवारी पिवळ्या गायीला सव्वा पाव किंवा सव्वा किलो हळद मिश्रित हरभऱ्याची डाळ खाऊ घाला. दर गुरुवारी हळदीचा टिळक कपाळी लावा.