शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2021
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (16:50 IST)

साप्ताहिक राशीफल 7 ते 13 मार्च 2021

मेष - गुरूकृपा व शुक्राची साथ मिळाल्याने पुष्कळसे प्रश्न सोडविता येतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. प्रकृतीची पथ्ये मात्र पाळा. आपल्या मनातील शंकाचे वेळीच निराकरण करा. अनपेक्षीत खर्चाचे प्रसंग येतील. कुटुंबियांच्या मताचा विचार करा. मंगळचा सहयोगाचा प्रतिसाद संमिश्र स्वरूपाचा राहणारा राहील, त्यामुळे त्याची चिंता करू नका.
 
वृषभ - प्रकृतीकडे मात्र दुर्लक्ष करू नका. व्यवसायात प्राप्त परिस्थितीवर मात करणे शक्य होईल. आपल्या सहकारीवर्गाचे मार्गदर्शन उपकारक ठरेल. प्रियव्यक्तिचा विश्वास संपादन कराल. मंगळ सहयोग आपल्या कार्यक्षेत्रात अनेक प्रकारचे वादग्रस्त प्रसंग, प्रश्न निर्माण करू शकतो.
 
मिथुन - अर्थप्राप्तीचा वेग वाढेल्याने समाधान होईल.आपल्या व्यवहारचातुर्याचे कौतुक होईल. शनी - मंगळाचा सहयोग संशयास्पद होऊ शकतो पण शुक्राची साथ मिळाल्याने नाराजी राहणार नाही . आपले दैनंदिन व्यवहार, उपक्रम चालू राहू शकतील. कार्यसाध्यासाठी गोड बोलून यश पदरात पडण्याचे धोरण हितकारक राहील. पैशाची आवक ठीक राहील .
 
कर्क - कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही व प्रकृतीस्वास्थ्यावर पडसाद पडणार नाहीत यावर लक्ष ठेवा. रवी, बुध, शुक्र, गुरू अशा बलवान ग्रहांची साथ मिळाल्याने आपला यशाचा मार्ग अधिक वेगवान होईल. पण चतुर्थातील शनी - मंगळ सहयोग यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करील . पण नाउमेद न होता कार्यक्षेत्रात बदल करू नका.
 
सिंह - प्रवास कराल . मात्र नको त्या प्रलोभनांना बळी पडू नका. घरगुती वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. रवी - बुध, गुरू यांचे उत्तम सहकार्य मिळाल्याने आपल्या परिश्रमाचे, मेहनतीचे चीज झाल्याचा आनंद व समाधान मिळू शकेल . गणेशोत्सवाचा आनंद घ्याल, व नवे उपक्रम राबविणे शक्य होईल. शनी - मंगळ सहयोगाची प्रखरता जाणवणार नाही. लहानसहान मिळणाऱ्या संधीचा लाभ घेऊन त्वरित कृती अंमलात आणणे अधिक लाभदायक ठरू शकते .
 
कन्या - शनी - मंगळ सहयोगातील दूषित परिणामातून बाहेर पडण्यासाठी अथक प्रयत्नांची, हुशारीची जोड द्या. गणेशाची उपासना उपयोगी पडेल. काही महत्त्वाच्या समस्या सोडविणे शक्य होईल. आपल्या प्रयत्नांना बऱ्यापैकी यश मिळू शकेल . सामाजिक स्तर उंचावेल. चर्चासत्र, बैठकी, जनसंपर्क, व्यापारी उलाढाली या गोष्टींचा चांगला लाभ घेता येईल .
 
तूळ - कायदा व अधिकार यांच्या कचाट्यात सापडू नका. विचाराने वागा. शनी साडेसाती, त्यात मंगळ, अष्टमात गुरू व व्ययस्थानी रवी - बुध अशा प्रतिकूल परिस्थितीत यशाच्या मोठ्या अपेक्षा करणे योग्य होणार नाही. नवीन समस्या, आव्हाने यांना आमंत्रण मिळते, पण या गोष्टीत चुका होणार नाहीत याची दक्षता घ्या. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा.
 
वृश्चिक - गुरू, शुक्र, रवी, बुध यांची साथ मिळाल्याने यशाचा मार्ग सुलभ होईल. प्रवास कराल. नव्या ओळखींचा लाभ घेता येईल . आपली प्रतिमा चांगली ठेवता येईल . कलाक्षेत्रात प्राविण्य मिळवाल. खर्च वाढला तरी आवकही ठीक राहील. व्ययस्थानी शनी - मंगळ आपल्या योजनांमध्ये अडथळे आणू शकतात. स्पर्धा, साहस या गोष्टींपासून दूर राहा. काही चांगल्या घटना घडतील. गणपती उत्सवाच्या काळात नवे उपक्रम सुरू करता येतील.
 
धनू - प्रलोभने, आश्वासने यांपासून दूर राहा. आपल्या हातून चुका होणार नाहीत याची दक्षता घ्या. बौद्धिक गोष्टींचा वापर करून पुढे जाण्याचा मार्ग स्वीकारा. स्वयंसिद्ध व्हा. प्रकृतीची पथ्ये पाळा. षष्ठात गुरू, अष्टमात शुक्र, व्ययात राहू व शनी - मंगळ सहयोग अशा प्रतिकूल ग्रहमानात व्यवहाराची गणिते चुकतात व आपले अंदाजही चुकतात.
 
मकर - दशमातील शनी - मंगळ संशयाचे वातावरण करू शकतो पण विचलित होऊ नका. पुढे जात राहा. पंचमात गुरू , सप्तमात शुक्र, भाग्यात रवी - बुध, दशमात राहू यांच्या उत्तम प्रतिसादामुळे मकर व्यक्ती विविध क्षेत्रांत आपला प्रभाव कार्यक्षेत्रात पाडू शकतील. शिक्षण, कला, साहित्य, व्यापार, नोकरी अशा विविध गोष्टींचा यात समावेश होऊ शकेल.
 
कुंभ - परिचित मंडळी व परिवारातील व्यक्ती यांचा उपद्रव होण्याची शक्यता असते तेव्हा सावध राहा, सतर्क राहा. चतुर्थात गुरू, षष्ठात शुक्र, अष्टमात रवी - बुध अशा प्रतिकूल ग्रहस्थितीत संयमाने वागणे, सरकारी नियम पाळणे, गुप्तता पाळणे ह्या गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक असते. अशा गोष्टींनी आपण आपली प्रतिष्ठा शाबूत ठेवू शकाल. वरिष्ठांशी मिळतेजुळते घ्या.
 
मीन - पेक्षितांकडून उत्तम मदतीचा हात मिळाल्याने कामाचा वेग वाढेल. मात्र शनी - मंगळ अष्टमात आहेत तेव्हा स्पर्धा, साहस टाळा. मौल्यवान वस्तू सांभाळा व प्रकृती जपा. पराक्रमी गुरू, पंचमात शुक्र, सप्तमात रवी - बुध, भाग्यात राहू अशा छान ग्रहमानात आपल्या कर्तृत्वाला उत्तम वाव मिळेल. कला, साहित्य, शिक्षण, व्यापार आदी क्षेत्रांचा समावेश होऊ शकेल. प्रवासाचे योग येतील.