testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सनी देओल यांचा भाजपमध्ये प्रवेश, गुरूदासपूरमधून निवडणूक लढविण्याची शक्यता

चित्रपटांमधून देशभक्तीचे धडे देणाऱ्या व्यक्तिरेखा साकारल्यानंतर अभिनेता सनी देओलनं आता राजकारणात एन्ट्री घेतली आहे. सनी देओलनं भाजपमध्ये प्रवेश केला असून आपण बोलण्यापेक्षा आता काम करण्यावर भर देऊ असं स्पष्ट केलं आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांच्या उपस्थितीत सनी देओल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
दोन दिवसांपूर्वीच सनी देओल यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच त्यांच्या पक्ष प्रवेशाबद्दलचे अंदाज लावले जात होते. सनी देओलला पंजाबमधील गुरूदासपूरमधून उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यताही वर्तवली जातीये.

"पंतप्रधान मोदींनी देशासाठी खूप काही केलं आहे. पुढची पाच वर्षंही देशाला त्यांच्याच नेतृत्वाची गरज आहे. कारण आपल्याला पुढं जायचं आहे. विकास करायचा आहे," अशी भावना सनी देओल यांनी आपल्या पक्ष प्रवेशाच्यावेळेस व्यक्त केली. "माझे व़डील अटलबिहारी वाजपेयींसोबत राहिले होते. त्याचप्रमाणे मीसुद्धा कायम नरेंद्र मोदींसोबत राहीन," असंही सनी देओल यांनी यावेळी बोलताना म्हटलं.
सनी देओल आणि देशभक्ती
सनी देओल यांचा पक्षात प्रवेश होणार असल्याचं समजल्यानंतर मला त्यांच्या बॉर्डर चित्रपटाची आठवण आली. हा चित्रपट राष्ट्रवादाचं उदाहरण असल्याचं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं. अनेक लोकप्रिय भूमिका साकारणाऱ्या सनी देओल यांना लोकांची नस अचूक माहिती असल्याचंही सीतारमण यांनी म्हटलं.

पीयूष गोयल यांनी म्हटलं, "सनी देओल यांनी विविध चित्रपटांतून देशप्रेमाची भावना जागवली आहे. तरूणांचं मनोबल वाढवलं आहे. श्रीलंकेतील हल्ला, भारतात कट्टरपंथी विचारांची होणारी चर्चा या सर्व पाश्वर्भूमीवर तरूणांच्या विचारांना दिशा देण्याचं काम सनी देओल करू शकतील. ज्या निष्ठेनं, श्रमानं त्यांनी चित्रपटात काम केलं. त्याच मेहनतीनं देशाची सेवा करतील."
सनी देओल यांच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी
सनी देओल यांचे वडील आणि प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र हेदेखील भाजपचे खासदार होते. 2004 सालच्या लोकसभा निवडणुकीत धर्मेंद्र राजस्थानच्या बिकानेरमधून निवडून आले होते.

2009 साली मात्र ते राजकारणातून दूर झाले. धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी या 2014 मध्ये मथुरेमधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. आताही त्या मथुरेमधूनच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींचा प्रचारही केला होता.
1982 साली प्रदर्शित झालेल्या 'बेताब' या चित्रपटातून सनी देओल यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 1990 मध्ये आलेल्या 'घायल' या चित्रपटानं त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. 1993 साली आलेल्या 'दामिनी' चित्रपटातील सनी देओल यांची वकिलाची भूमिकाही गाजली होती. बॉर्डर, गदर , हिरो यासारख्या चित्रपटांमधून सनी देओल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...