शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 27 एप्रिल 2020 (18:42 IST)

राज्यात पावणेदोन लाख आयसोलेशन खाटांची उपलब्धता -आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात कोरोनासाठी त्रिस्तरीय उपचार व निगा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
 
सध्या तीन वर्गवारीतील 1677 उपचार केंद्र असून त्यामध्ये 1 लाख 76 हजार 347 विलगीकरण (आयसोलेशन) खाटांची संख्या आहे तर 7248 अतिदक्षता (आयसीयू) खाटांची उपलब्धता आहे.
 
सुमारे तीन हजार व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. 80 हजाराच्या आसपास पीपीई किटस तर 2 लाख 82 हजार एन 95 मास्क उपलब्ध आहेत, अशा प्रकारे कोरोना उपचाराची सज्जता असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.
 
केंद्र शासनाच्या सूचनांनुसार कोरोनावरील उपचारासाठी तीन श्रेणींमध्ये रुग्णालयांची वर्गवारी केली आहे. श्रेणी-1मध्ये अधिकृत कोविड रुग्णालय, श्रेणी- 2 मध्ये अधिकृत कोविड रुग्णालय व निगा केंद्र तर श्रेणी 3 मध्ये कोविड रुग्ण निगा केंद्र यांचा समावेश होतो.
 
या तीनही श्रेणीतील उपचार केंद्रामध्ये तापाचे रुग्ण तपासण्यासाठी फिवर क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत.