शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 3 जून 2020 (15:34 IST)

'मातोश्री'वरच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्रे येथील निवासस्थान 'मातोश्री' या ठिकाणी पाळीव कुत्र्याचा सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालं आहे.  
 
'मातोश्री' येथिल कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण बंगला सॅनिटाईज करण्यात आला आहे. ठाकरे कुटुंबीयांनी कोरोना टेस्ट केल्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नसली तरी, त्यांना आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगितलं आहे.
 
एच ईस्ट वॉर्डाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांनी सांगितलं, "एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलं असून त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. 'मातोश्री' येथे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. बहुतांश जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. काही रिपोर्ट येणं बाकी आहे.
 
"मुख्यमंत्र्यांचाया कुटुंबातील कोणत्याही सदस्याला होम क्वारंटाईन होण्यास सांगितलं नाहीय, कारण कुणीही रुग्णाच्या थेट संपर्कात आलेलं नाही," असंही ते म्हणाले.