गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 5 ऑक्टोबर 2019 (14:21 IST)

झुंडबळीविरोधात मोदींना पत्र लिहिणाऱ्यांवर राजद्रोहाचा गुन्हा

Crime of treason against those who wrote to Modi against mob violence
देशाच्या विविध भागांमध्ये अलीकडच्या काळात झालेल्या झुंडबळींच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या नऊ नामवंत लेखक, कलाकार, विचारवंतांसह 49जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नामवंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून झुंडबळी रोखण्यासाठी कडक कायदा करण्याचे आवाहन केलं होतं.
 
बिहारमधील मुझफ्फरपूर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यात अभिनेत्री अपर्णा सेन, इतिहास संशोधक-लेखक रामचंद्र गुहा, दिग्दर्शक मणी रत्नम, श्याम बेनेगल, अदूर गोपालकृष्णन, अभिनेता सौमित्र सेन, शास्त्रीय गायिका शुभा मुद्गल, अभिनेत्री रेवती आणि कोंकणा सेन आदींचा समावेश आहे.