1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मे 2020 (15:14 IST)

केंद्रीय मंत्र्याला हे शोभतं का? -पृथ्वीराज चव्हाणांची पीयुष गोएलांवर टीका

Does this suit the Union Minister? Prithviraj Chavan
"पीयुष गोयल यांनी पदाची मर्यादा राखायला हवी. ते ट्वीटवरून उत्तर देतात. हे केंद्रीय मंत्र्याला शोभतं का? केंद्रीय मंत्र्याने कसं वागायला हवं? एकमेकांना दोष द्यायचा तर केंद्राचेही अनेक दोष आहेत," असं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
 
राज्य सरकार आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यात पृथ्वीराज यांनीही उडी घेतली आहे.  
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशी भाषा करू नये. त्यांना रोजगार निर्माण करता आला नाही म्हणून हे लोक महाराष्ट्रात आले. त्यांची राज्यात काळजी घेतली नाही. पण असं आरोप करून उत्तर मिळणार नाही, असं पृथ्वीराज म्हणाले.