मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

'JNUचे कुलगुरु जगदीशकुमार हेच हल्ल्यामागील मास्टरमाइंड'

JNUचे कुलगुरू जगदीशकुमार हेच त्या विद्यापीठातील हिंसक हल्ल्यामागील मास्टरमाइंड असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसच्या सत्यशोधन समितीने केली आहे.
 
JNU हल्ल्यामागील सत्य शोधून काढण्यासाठी काँग्रेसने चार जणांची समिती नेमली होती. या समितीच्या सदस्या सुष्मिता देव यांनी पत्रकार परिषदेत कुलगुरू एम. जगदीशकुमार, विद्यापीठाची सुरक्षाव्यवस्था सांभाळणारी कंपनी तसेच प्राध्यापकांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी. कुलगुरुंना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे असे त्यांनी सांगितले. या समितीमध्ये सुष्मिता देव, हिबी एडन, सय्यद नासीर हुसेन, अमृता धवन यांचा या समितीत समावेश होता.