शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मे 2019 (10:11 IST)

मोदींनी केलं नवीन पटनायक यांचं कौतुक

Modi praised Naveen Patnaik
ओडिशात आलेल्या फणी वादळामुळे प्रभावित झालेल्या भागाचं पुनर्वसन करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी 1,000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.  
 
सोमवारी या भागाची हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "नवीन पटनायक यांच्या सरकारने किनारी भागातील लोकांना वेळेवर हलवून जीवितहानी टाळली."
 
त्यांनी राज्यातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांबरोबर आणि केंद्रीय अधिकाऱ्यांबरोबर बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर बैठकही घेतली. फणी वादळात मृतांचा आकडा 35 वर गेला आहे. मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजाराची मदत मोदींनी सोमवारी जाहीर केली.
 
दरम्यान, या मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आपण दोनदा फोन केला. मात्र त्यांना फोन घेतला नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
त्यावर बोलताना "मी मोदींना पंतप्रधान मानत नाही. आम्ही स्वतःची मदत करण्यास समर्थ आहोत. मी नवनिर्वाचित पंतप्रधानांशी बोलेन," असं वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केलं. इंडिया टुडेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.