बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (14:57 IST)

Oscar award: ऑस्कर पुरस्काराविषयी या आठ गोष्टी माहिती आहेत का?

ऑस्कर पुरस्कार हा जगात सगळ्यात प्रतिष्ठेचा पुरस्कार सन्मान समजला जातो.
 
जोकर पुरस्काराला ऑस्करमध्ये 11 विभागात नामांकनं मिळाली. द आयरिशमॅन, 1917, Once upon a time in a Hollywood या चित्रपटांना 10 विभागांमध्ये नामांकनं मिळाली आहेत.
 
अशा अनेक बातम्या आपण नेहमीच वाचतो. या प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराविषयी काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊया.
 
1.महिलांचा सहभाग
 
ऑस्कर पुरस्काराच्या 92 वर्षांच्या इतिहासात फक्त पाच महिलांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या विभागाअंतर्गत नामांकन मिळालं आहे. त्यातही फक्त कॅथरीन बिगेलो यांनाच द हर्ट लॉकर या चित्रपटासाठी ऑस्कर मिळाला होता.
 
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या विभागात यावेळीही सर्व पुरुषच दिसत आहेत. ग्रेटा गर्विग यांना लिटिल वुमेन या चित्रपटासाठी नामांकनाच्या शर्यतीत होत्या. मात्र त्यांना नामांकन मिळालं नाही.
2018 मध्ये त्यांना लेडी बर्ड या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या वर्गवारीत त्यांना नामांकनं मिळालं होतं. गेल्या 12 वर्षांत कोणत्याही महिलेला कोणताही स्क्रीनप्ले पुरस्कार मिळालेला नाही.
 
यावर्षी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या नामांकनांची माहिती देताना अभिनेत्री इसा रे म्हणाल्या, "सर्व पुरुषांना शुभेच्छा."
 
2. वय
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता या विभागातील पुरुष भागात नामांकनांचं सरासरी वय 71 आहे. त्यातील 56 वर्षीय ब्रॅड पिट सर्वांत तरुण आहेत. त्यांच्या शिवाय टॉम हँक (63), जो पेस्सी (76) अल पचिनो (79) आणि अँथनी हॉपकिन्स (82) यांचा या वर्गवारीत समावेश आहे.
 
अभिनेत्रींच्या नामांकनांचं सरासरी वय 40 आहे. एका संशोधनानुसार नामांकनच्या बाबतीत हॉलिवूडमध्ये अभिनेत्यांच्या तुलनेत कमी वयाच्या अभिनेत्रींना प्राधान्य दिलं जातं. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं ना? बॉलिवूडमध्येही हीच परिस्थिती आहे. वय झालेले अभिनेते तरुण अभिनेत्रींबरोबर रोमांस करताना दिसतात.
 
हा काही फार मोठा मुद्दा नाही मात्र त्याची दुसरी बाजू फारशी चांगली नाही.
 
3. विविधता
2019 पर्यंत एकाच कृष्णवर्णीय अभिनेत्रीने 2002 मध्ये हॅली बेरीने सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला होता. अभिनय या वर्गवारीत 2020 मध्ये सिंथिया एरिवो या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या विभागासाठी नामांकन मिळालं आहेत. ती गौरवर्णीय नाही.
 
या वर्षी ज्या अभिनेत्रींना नामांकन मिळालं त्या 20 अभिनेत्रींपैकी 19 अभिनेत्री गौरवर्णीय आहेत.
 
गेल्या 10 वर्षांत अभिनय या वर्गात 200 नामांकनांपैकी फक्त सात कृष्णवर्णींयांनी ऑस्कर जिंकला आहे. गेल्या काही वर्षांत #OscarsSoWhite असा हॅशटॅग ट्रेजड होत आहे.
 
4.सर्वाधिक नामांकनं
जॉन विलियम्सला स्टार वॉर्स: द राईज ऑफ स्कायवॉकर साठी नामांकन मिळालं आहे. हे त्यांचं 52वं नामांकन आहे. एका 87 वर्षीय संगीतकाराला नामांकन मिळालं होतं.
 
5. स्कारलेट जॉन्सनला यावर्षी दोन नामांकनं
मॅरेज स्टोरीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि जोजो रॅबिट साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या विभागात हे नामांकन मिळालं आहे. एकाच वर्षांत दोन नामांकन मिळणारी ती 12 वी व्यक्ती आहे. मेरिल स्ट्रिप यांना आतापर्यंत 21 नामांकनं मिळाली आहेत. त्यापैरी त्यांना तीनदा पुरस्कार मिळाला आहे.
 
6. नेटफ्लिक्सचा दबदबा
नेटफ्लिक्सवर प्रसारित झालेल्या मॅरेज स्टोरी, द आयरिश मॅन आणि टू पोप्स या चित्रपटांना देखील नामांकन मिळालं आहे.
 
7. ऑर्क्रेस्ट्रात भाग घेणारी पहिली महिला
आयरिश संगीतकार अयमेयर नून ऑस्कर मधील ऑर्केस्ट्रामध्ये सहभाग घेणारी पहिली महिला आहे.
 
8. एका घरातच स्पर्धा
ग्रेटा गर्विग आणि नोआह बाऊमबश या दिग्दर्शक जोडप्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नामांकन मिळालं आहे. 2011 पासून ते एकत्र आहेत. त्यांना एक मूलसुद्धा आहे.