मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

मंत्रालयाला सुट्टी नाही; रोज सुरू राहणार

The ministry has no vacation; Every day will continue
राज्याचा गाडा हाकला जाणाऱ्या मंत्रालयाला आता सुट्टी असणार नाही. तब्बल 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच दररोज मंत्रालयीन कामकाज सुरू राहणार असल्याने राज्यातील जनतेला आठवडाभरात कधीही येऊन मंत्र्यांकडे त्यांचं गाऱ्हाणं मांडता येईल.
 
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भाचे होते. त्यामुळे कामकाजाच्या दिवसांनंतर विदर्भ दौऱ्यावर असायचे. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हेही मुंबईचे नव्हते. परिणामी मंत्रालयाचं कामकाज तीन ते चार दिवस सुरू असायचं. मनोहर जोशी आणि नारायण राणे यांचं मुंबईत वास्तव्य होतं. ते दोघेही दररोज मंत्रालयात यायचे. आता त्याचीच पुनरावृत्ती 25 वर्षांनंतर होते आहे, असं महाराष्ट्र टाइम्सने म्हटलं आहे.