बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

रमणीय समुद्रकिनारे

कुटुंबासोबत मस्तपैकी फिरायला जायला, रिलॅक्स व्हायला प्रत्येकालाच आवडतं. काहींना हिल स्टेशन आवडतात तर काहींना समुद्रकिनारे खुणावतात. तुम्हाला समुद्राच्या लाटांवर स्वार व्हायला आवडत असेल तर या ड्रीम डेस्टिनेशन्सचा विचार करा.

* अंदमान-निकोबारमधल्या हॅवलॉक बेटांपासून साधारण 12 किमी अंतरावर राधानगर बीच आहे. या बीचवरील शांत वातावरण आणि मस्त हवामान यामुळे इथे पर्यटकांची गर्दी असते. राधानगर हा जगातल्या सर्वोत्कृष्ट बीचपैकी एक आहे.
 
 
* गोवा हे अनेकाचं फेवरिट डेस्टिनेशन असतं. दक्षिण गोव्यात फिरतं असाल तर अगोंदा बीचवर नक्की जा. सोनेरी वाळू आणि निळ्याशार समुद्राच्या साक्षीने सुटी इंजॉय करायला तुम्हाला नक्कीच आवडेल.
 
* गोव्यातला केवलोसीम बीचही खूप सुंदर आहे. या ठिकाणी पांढरी वाळू पाहायला मिळते. हा समुद्रकिनारा मोठा आणि शांत आहे.
 
* दक्षिण केरळमधला वर्कला बीच खास आकर्षण मानला जातो. या ठिकाणी अरबी समुद्रालगत मोठे मोठे खडक आहेत.
 
* शांतपणे पहुडायचं असेल तर गोव्यातला बेनोलीम बीचवर जाता येईलं. इथला कँडोलीम बीचही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पर्यटकांची संख्या तुलनेनं कमी असल्याने शांतता अनुभवता येते.
 
* ओरिसातल्या पुरीमधील बीचही खूप सुंदर आहे. जगन्नाथ पुरी हे प्रसिद्ध तीर्थस्थान आहे. या ठिकाणी आल्यावर पुरी बीचला नक्की भेट द्या.
 
* अंदमान-निकोबार बेटांवरच्या एलिफंटा बीचला नक्की भेट द्या. इथे खूप धमाल करता येते.
पणजीपासून 50 किमीवरील अरंबोल बीचवर शांतता अनुभवता येते. इथपर्यंत येण्याचा मार्गही खूप सुंदर आहे.
 
* अलिबागजवळीक नगांव बीचदेखील रमणीय आणि शांत आहे.