testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

भोपाळमध्ये ताजमहाल!

taj mahal, bhopal
ताजमहाल म्हटले की आपणाला आठवते ते शहर म्हणजे आग्रा. पण मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथही एक ताजमहाल आहे परंतू त्याला मकबरे नाहीत आणि त्याची कोणतीही लव्हस्टोरी नाही. मुघल वास्तू कलेचा बेजोड नमुना असलेला हा महाल बादशहा शाहजहानने बांधलेला नसून तो बांधला आहे बेगम शाहजहानने.
1861 ते 1901 या काळात भोपाळ संस्थानची प्रमुख असलेल्या बेगम शहजहान हिने स्वत: राहण्यासाठी राजमहाल बांधला परंतू याचे सौंदर्य इतके अप्रतिम होते की त्याचे ताजमहाल असे आपोआपच नामकरण झाले. या महालात 120 खोल्या आहेत. 8 मोठे हॉल आहेत. हा बांधण्यासाठी 13 वर्षे लागली. सतरा एकर परिसरात याचे बांधकाम पसरले आहे. यासाठी त्याकाळात तीन लाख रूपये खर्च आला होता. हा महाल तयार झाल्यानंतर तीन वर्षे बेगमने जल्लोष साजरा केला होता.

या ताजमहालाबाबत एक आठवण सांगितली जाते. याच्या प्रवेशद्वारावर एक विशिष्ट प्रकारची काच बसवण्यात आली होती, त्यातून परावर्तीत होणारी किरणे प्रवेश करणार्‍या व्यक्‍तीच्या डोळ्यावर पडत. त्यामुळे त्याला प्रवेश करताना खाली मान घालूनच आत जावे लागे. एका ब्रिटिश अधिकार्‍याला हा अपमान वाटला, म्हणून त्याने बेगमला ती काच काढण्याचा हुकूम केला. बेगमने तो साफ नाकारला. दहावेळा इशारा देऊनही बेगमने ती काच काढली नसल्याचे पाहून अधिकारी स्वत: तेेथे आला. त्याने आपल्या सैनिकांकरवी बंदुकीचे शंभर राऊंड फायर केले, तरीही ती काच फुटली नाही. या महालातून एक भुयार असून ते 40 किलोमीटर लांब असलेल्या रायपूर शहरात जाते, असे सांगितले जाते.


यावर अधिक वाचा :

तर ही आहे मलाइकाची आवडती बेड पोझिशन

national news
बॉलीवूडची यम्मी मॉम मलाइका अरोराची हॉटनेस तिच्या वयासोबत वाढत आहे. ती सोशल मीडियावर ही ...

आंबा हंगामामुळे नवीन मराठी म्हणी

national news
आंबा खावासा वाटल्यावर झाड लावणे. ( तहान लागल्यावर विहीर खोदणे )

श्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी आमिर द्धिधा मनस्थितीत

national news
परफेक्शनिस्ट आमिर खान महाभारतावर बनत असलेल्या एका वेब सीरिजमध्ये श्रीकृष्णाची भूमिका ...

"अर्जुनचा श्रीकृष्णाला प्रश्न"

national news
"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग ...

मिलिंद सोमण आणि अंकिता विवाहबद्ध

national news
गेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना ...