बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीएमसी चुनाव 2022
Written By
Last Modified: मंगळवार, 31 मे 2022 (10:44 IST)

राज्यातील 14 महापालिकांची आरक्षण सोडत ओबीसी आरक्षणाशिवाय आज जाहीर

voters
राज्यात महापालिका निवडणुकांची जय्यत तयारी सुरु होणार असून आज राज्यातील 14 महापालिकांची आरक्षण सोडत जाहीर होणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणा शिवायच पार पडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या 14  महापालिकांपैकी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली ,पुणे, नागपूर आणि कोल्हापूरच्या सोडतीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक आज वाढणार आहे. 
 
महापालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 27 मे ते 13 जूनपर्यंत सुरू राहणार आहेत. तर आज मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे या महापालिकांची आरक्षण सोडत आज जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे नगरसेवक होण्याचं स्वप्न बघणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. आज 14 महापालिकांची आरक्षण सोडत आज मुंबईत वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडणार आहे.