शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 15 ऑक्टोबर 2016 (12:32 IST)

जानेवारीत झळकणार तापसीचा ‘रनिंग शादी’

‘पिंक’ चित्रपटामुळे अभिनेत्री तापसी पन्नूचे खूप कौतुक झाले. ती आता तिच्या नव्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. 
 
जानेवारीत तापसीचा ‘रनिंग शादी डॉट कॉम’ हा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दोन वर्षापासून ‘रनिंग शादी डॉट कॉम’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अडकला आहे. ‘बेबी’ चित्रपटाच्या अगोदर हा चित्रपट तापसीने पूर्ण केला होता. पण प्रदर्शनात खूप अडथळे येत गेले. 
 
यात तापसी आणि अमित साद यांची जोडी आहे. याचे शूटिंग अमृतसर पंजाबमध्ये झाले असून शूजित सरकार याचे निर्माता आहेत. 
 
तापसी पन्नू शूजित सरकार यांच्या ‘पिंक’ चित्रपटात झळकली होती. यात अमिताभ बच्चनसह कीर्ती कुल्हारी आणि अंगद बेदी यांच्या भूमिका होत्या.