शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

नीरजा भनोटशी निगडित मुख्य गोष्टी

बॉलीवूड ऐक्ट्रेस सोनम कपूर पडद्यावर नीरजा भनोटची भूमिका साकारण्यासाठी तयार आहे, आणि त्यामुळे एकदा परत नीरजा भनोट  चर्चेत आली आहे. तुम्ही किती ओळखता नीरजा भनोटबद्दल? एवढंतर माहीतच असेल की 22 वर्षांची ऐअर होस्टेस नीरजा भनोटने 1986मध्ये हायजॅक झालेल्या प्लेनमध्ये प्रवाशांचा जीव वाचवता वाचवता आपला जीव गमावला होता. तिच्याशी निगडित काही गोष्टी.   क्लिक करा ...
  
मुंबईचे पत्रकार हरीश भनोट आणि रमा भनोट यांची मुलगी नीरजाचा जन्म 7 सप्टेंबर 1963मध्ये चंडीगढ येथे झाला होता.  
 
नीरजाने बॉम्बे स्कॉटिश शाळेतून स्कूलिंग करून सेंट झेवियर्स कॉलेजहून ग्रॅज्युएशन केले होते. तिचे आई वडील तिला प्रेमाने 'लाडो' म्हणत होते. 
21 वर्षात नीरजाचे लग्न झाले होते आणि ती नवर्‍यासोबत वेस्टर्न एशिया गेली होती.  
 
पण हुंडा प्रकरणामुळे ती मुंबईत परतली.  
 
येथे येऊन तिने पॅन अमेरिकन एअरवेजमध्ये नोकरी करणे सुरू केले. 
असे म्हणतात की ट्रेनिंग दरम्यान नीरजाला एंटी-हायजॅकिंग कोर्समध्ये प्रवेश घ्यावे लागले होते तर तिच्या आईने तिला नोकरी सोडायला सांगितले, तर नीरजाचे उत्तर होते - जर सर्व आयांनी अशाच विचार केला तर देशाचे भविष्य काय होईल?
 
एअर-होस्टेस बनण्या अगोदर तिने बेंजर सारीज, बिनाका टूथपेस्ट, गोदरेज बेस्ट डिटरजेंट, वॅपरेक्स आणि विको टरमरिक क्रीम सारख्या  उत्पादांसाठी मॉडलिंग केले होते.  
नीरजा सर्वात युवा आणि प्रथम महिला होती, जिला अशोक चक्र मिळाला (मृत्यू उपरांत). अशोक चक्र भारताचा शांतीच्या वेळेसचा सर्वात उच्च वीरतेचा पदक आहे.  
 
अशोक चक्रासोबत नीरजाला फ्लाईट सेफ्टी फाउंडेशन हिरोइजम अवॉर्ड, यूएसए, तमगा-ए-इंसानियत-पाकिस्तान, जस्टिस फॉर क्राईम्स अवॉर्ड, यूनाइटेड स्टेट्स अटॉर्नीज ऑफिस फॉर द डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, स्पेशल करेज अवॉर्ड, यूएस गवर्नमेंट आणि इंडियन सिविल एवियेशन मिनिस्ट्रीज अवॉर्ड सारख्या सन्मानाने सन्मानित करण्यात आले.