रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By विकास शिरपूरकर|
Last Modified: शनिवार, 15 मे 2010 (10:55 IST)

मी क्रिकेटबद्दल बोलण्यास पात्र नाही- सैफ अली खान

आपण एक अभिनेता असून, आपल्याला क्रिकेटवर बोलण्याचा अधिकार नसल्याचे माजी क्रिकेटपटू नवाब मन्सूर अली खान पटौदी यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याने स्‍पष्‍ट केले आहे.

आगरा येथे प्रसारमाध्यमांनी सैफला भारतीय क्रिकेट संघाच्या गचाळ प्रदर्शनाविषयी विचारले असता तो म्हणाला, की या बाबतीत आपल्याला काही माहिती नसून, आपल्याला संघाविषयी बोलण्याचा अधिकार नाही.

आपल्याला क्रिकेटविषयी काहीही घेणे देणे नसून, आपण अभिनयातच व्यस्त असल्याचे त्याने स्पष्ट केले. सैफ सध्या त्याच्या 'एजंट विनोद' या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.