गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

आमिरने टोचवले कान

बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एकच नाव येते ते म्हणजे आमिर खान. त्याने मुख्य भूमिका केलेल्या दंगल चित्रपटाने देशातच काय तर जगभरात दंगले केली आहे. या चित्रपटासाठी त्याने चक्क 30 किलो वजन वाढवले होते. पण आता वजय कृष्णा आचार्य याच्या आगामी ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटात आमिर झळकणार आहे. पण या चित्रपटासाठी त्याला त्याचा मेकओव्हर करावा लागला आहे.
चित्रपटाच्या पात्राला शोभणार लूक त्याने बनवला आहे. यासाठी त्याला नाक आणि कान टोचून घ्यावे लागले. पण नाक आणि कान टोचल्यानंतर त्याला असहाय्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार शूटिंगच्या दरम्यान जर चुकून त्याच्या कानाला हात लागला तरी त्याला या असहाय्य वेदनांचा सामना करावा लागत आहेत.