1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 मार्च 2023 (12:44 IST)

जेव्हा सैफ फोटोग्राफर्सला म्हणाला आमच्या बेडरूममध्ये या

Aap humare bedroom mein aa jaiye
सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी फोटोग्राफर्स अनेकदा उत्सुक असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये सैफ अली खान पत्नी करीना कपूरसोबत दिसत आहे. जेव्हा फोटोग्राफरने त्याला फोटोसाठी विचारले तेव्हा सैफ अली खानने त्याला असे उत्तर दिले की सगळेच आश्चर्यचकित झाले. या व्हिडिओमध्ये सैफ अली खान आणि करीना कपूर कुठूनतरी परतताना दिसत आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

व्हिडिओमध्ये सैफ अली खान आणि करीना कपूर खान येत आहेत. जेव्हा फोटोग्राफर्सने त्याला पोज देऊन मागे बघायला सांगितले तेव्हा सैफ अली खान नाराज झाला आणि म्हणाला एक काम करा आमच्या बेडरूममध्ये या. अशा प्रकारे सैफ अली खामचा मूड चांगला नसल्याचं फोटोग्राफर्सना समजतं. यानंतर पती-पत्नी दोघेही घरात जातात आणि सैफ अली खान दरवाजा बंद करतो.
 
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावर सातत्याने प्रतिक्रियाही येत आहेत. या व्हिडिओमध्ये सैफ अली खान आणि करीना कपूरने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. मात्र या दरम्यान करीना कपूर अतिशय शांत दिसत असून तिच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळत आहे.