testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सैराटच्या रिमेकमध्ये आयुष- साराची जोडी!

aayush-sara
सलमान खानने आतापर्यंत हिंदी चित्रपट उद्योगाला अनेक नव्या चेहर्‍यांची ओळख करून दिली आहे. आता तो आपला मेहुणा आयुष शर्मा याला लाँच करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सलमान खान करण जौहरबरोबर मिळून एक चित्रपट बनवणार आहेत, ज्यामध्ये त्याचा मेहुणा आयुष शर्मा मुख्य नायकाच्या रूपात दिसून येणार आहे, तर या चित्रपटाद्वारे सैफ अली खानची मुलगी सारा अली खानदेखील आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात करणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून सारा अली खानविषयी चर्चा सुरू होती. दरम्यान, सारा स्टुडंट ऑफ द इयर-2 द्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा होती, परंतु साराची आई अमृताने हे वृत्त फेटाळून लावले होते. सलमान-करण जौहरद्वारे निर्मित हा चित्रपट एक प्रेमकथा असेल जो तरुण पिढीला लक्षात घेऊन बनविण्यात येणार आहे. स्वत: आयुषचीदेखील एका लव्ह स्टोरीद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची इच्छा आहे.
गेल्या वर्षी करण जौहरने मराठीमध्ये बनलेला चित्रपट सैराटच्या रिमेकचे अधिकार खरेदी केले होते. या चित्रपटाच्या रिमेकद्वारे आयुष व सारा यांना बॉलीवूडमध्ये आणण्याची तयार सुरू आहे.

सलमानची बहीण अर्पिताने भलेही आपल्या भावावर जोर टाकून आपल्या पतीला चि‍त्रपट उद्योगात प्रवेश मिळवून देण्यात यश मिळवले आहे परंतू या दबावामुळे सलमान खान एका चांगल्या अभिनेत्याला सादर करू शकेल का? हा प्रश्न आहे.


यावर अधिक वाचा :