शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (11:37 IST)

अभिनेत्री श्रुतीहासनचा नवा लूक पाहून नेटकरी चकित झाले, अभिनेत्री म्हणाली ....

प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांची मुलगी अभिनेत्री श्रुती हासनची नाकाची शस्त्रक्रिया करण्यात आली तिने आपल्या आजारपणातील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. तिच्या नाकाला दुखापत झाल्यामुळे तिच्या नाकावर शस्त्रक्रिया झाल्याचे तिने सांगितले होते. आता तिने इंस्टावर आपले काही फोटो शेअर केले आहे. या फोटो मध्ये तिचा एक वेगळाच लूक दिसत आहे. तिने फोटो शेअर करत म्हटले आहे की,  ताप सायनस चा त्रास , मासिक पाळीचा त्रास आणि आरामामुळे माझा सुजलेला चेहऱ्यामुळे माझे लूक चांगले होऊ शकले नाही. माझा हा लूक आवडेल अशी आशा बाळगते. तिने इंस्टावर शेअर केलेल्या फोटोमध्ये एकीकडे ती सुंदर दिसत आहे तर दुसरीकडे तिचा आजारपणाचा फोटो आहे. या फोटोमध्ये तिचे लूक वेगळे दिसत आहे. 
तिचा फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा देत तिचे कौतुक केले आहे. 

Edited By- Priya Dixit