शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 3 फेब्रुवारी 2024 (12:26 IST)

अभिनेत्री पूनम पांडेच्या निधना नंतर कुटुंब गायब!

अभिनेत्री पूनम पांडेच्या निधनाची बातमी शुक्रवारी समोर आली. या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच या बातमीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, ज्यांचे उत्तर कोणाकडेच नाही. अभिनेत्रीचा मृतदेह कुठे आहे हे कोणाला माहीत नाही. पूनम पांडेच्या निधनानंतर अनेक प्रश्न उद्भवत आहे. कुटुंबियांचे फोन देखील बंद आहे. लोखंडवाला येथील ज्या इमारतीत अभिनेत्री राहत होती त्या इमारतीच्या उद्यानात तिच्या निधनाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे द्यायला कोणीही तयार नाही. एवढेच नाही तर मुंबईतील वरळी येथे राहणाऱ्या पूनम पांडेच्या बहिणीने तिचा मोबाईल बंद केला आहे. 
 
अभिनेत्री पूनम पांडे हिचे 1 फेब्रुवारी रोजी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने निधन झाले. तिच्या निधनाची माहिती तिच्या मॅनेजर ने तिच्या इन्टाग्राम पोस्टवरून दिली. पूनमच्या टीम ने म्हटले आहे की त्यांना ही  बातमी पूनमच्या बहिणीने दिली. अद्याप तिच्या कुटुंबियांचे फोन बंद असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क अद्याप होऊ शकला नाही. पूनमच्या निधनानंतर तिचे संपूर्ण कुटुंब कुठे आहे हे माहित नाही. पूनमचे निधन कानपुर मध्ये झाल्याचं सांगितले जात आहे.तिच्या मृतदेहाबाबत कोणालाच कोणतीही माहिती नाही.तिच्यावर अंत्यसंस्कार झाले आहे की  नाही, या बाबतीत कोणालाच माहिती नाही. 
 
 Edited by - Priya Dixit