गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

ऐश्वर्या राय-बच्चनचे वडील कृष्णराज राय यांचे निधन

aisharya rai bachhan
अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचे वडील कृष्णराज राय यांचं निधन झालं. प्रदीर्घ आजारानंतर शनिवारी लीलावती रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लीलावतीमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. कृष्णराज राय यांचा कर्करोग बळावल्यामुळे त्यांचं निधन झालं.

त्यांच्या पश्चात पत्नी वृंदा राय, मुलगा आदित्य आणि ऐश्वर्या असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बच्चन कुटुंबीयांसोबतच दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, संजय लीला भन्साळी, अभिनेता शाहरुख खान, कुणाल कपूर यांसह अन्य कलाकारही उपस्थित होते.