1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सरबजीतसाठी ऐश्वर्या राय बच्चनला दादासाहेब फाळके पुरस्काराने केले सन्मानित!

aishwarya rai bachchan
‘सरबजीत’मध्ये ऐश्वर्याने सरबजीतची बहीण दलबीर कौर हिची भूमिका साकारली होती.
 
या भूमिकेसाठीच तिला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ऐश्वर्या लवकरच पती अभिषेकबरोबर एक चित्रपट करणार असल्याची चर्चा आहे.
 
वृत्तानुसार ऐश्वर्या आणि अभिषेक दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या आगामी ‘गुलाब जामून’या चित्रपटात काम करण्याची शक्यता आहे. दोघांनाही या चित्रपटाची कथा आवडली असल्याचीही माहिती समोर येत आहे.
 
या सेलेब्सलाही मिळालाल दादा साहेब फाळके एक्सलेंस पुरस्कार..
 
ऐश्वर्याव्यतिरीक्त संगीत श्रेणीमध्ये जुबिन नौटीयाल आणि पायल देव यांना काबिल चित्रपटाच्या टायटल गाण्यासाठी सर्वोत्तम गायनाचा पुरस्कार मिळाला.
बेस्ट दांडिया क्वीनचा पुरस्कार फाल्गुनी पाठकला दिला गेला. चित्रपट, शास्त्रीय संगीत गायनातील कार्किर्दीसाठी अनुप जलोटा यांना हा पुरस्कार मिळाला.
चित्रपटक्षेत्रातील गीतलेखनाच्या योगदानासाठी जावेद अख्तर यांना हा पुरस्कार दिला गेला.
सैयामी खेरला मिर्झ्या चित्रपटासाठी बेस्ट डेब्युचा पुरस्कार मिळाला.
झीनत अमान यांना लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार दिला गेला.
 याशिवाय राजू श्रीवास्तव, कीर्ति कुल्हरी, पियूष मिश्रा, हेमा मालिनी, राणा डूग्गुबती आणि उर्वशी रौतेलाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.