गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018 (00:53 IST)

आमिरच्या 'मोगुल'मध्ये अक्षयकुमारची वापसी

कॅसेटकिंग गुलशन कुार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अक्षयकुमार या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचीही चर्चा झाली, पण त्यात नंतर आमिर खानची वर्णी लागल्याचे म्हटले गेले. आता या चित्रपटासाठी पुन्हा एकदा अक्षयचे नाव समोर येत आहे. गुलशन कुमारच्या जीवनावर आधारित चित्रपटात अभिनेता अक्षयकुमार भूमिका साकारणार आहे. गुलशन कुमारांनी गायलेल्या भक्ती गीतामुळे ते लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचले होते. त्यांच्या जीवनावर आधारित चरित्रपटाची निर्मिती आमिर खान करणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक 'मोगुल' असे आहे. भारताची सर्वात मोठी म्युझिक कंपनी टी सीरिजच्या यशात गुलशन कुमारांचा मोठा वाटा आहे. गुलशन कुमारच्या मुख्य भूमिकेत अक्षयकुमार झळकणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष कपूर करणार असल्याचीही चर्चा आहे. आता याची अधिकृत घोषणा कधी होते, याकडेच अक्षय आणि आमिरच्या चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे.