1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 15 एप्रिल 2020 (10:26 IST)

अक्षय कुमारचे ट्विटर, इंस्टाग्राम आणि 100 मिलियन फॉलोअर्स

akshay kumars
लॉकडाऊनमध्ये देखील अभिनेता अक्षय कुमारचे सोशल मीडियावर तब्बल 100 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक या तीन आघाडीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलोअर्सची संख्या 100 मिलियन म्हणजेच 10 कोटींहून अधिक झाली आहे. मात्र, अद्याप सर्वाधिक फॉलोअर्सची नोंद अभिनेता सलमान खान याच्या नावावर आहे.

हा आकडा अक्षय कुमारने रविवारी पार केला आहे. अक्षयचे ट्विटरवर 3 कोटी 51 लाख 69 हजार 214, इंस्टाग्रामवर 38 लाख 87 हजार तेरा आणि फेसबूरवर 2 कोटी 60 लाख 25 हजार 204 फॉलोअर्स आहेत. या तीन प्लॅटफॉर्मवर अक्षय कुमारच्या अनुयायांची संख्या आता 10 कोटी 81 हजार 511वर गेली आहे. अक्षय कुमारने हा टप्पा पार करताच सोशल मीडियावरील त्याच्या चाहत्यांनी सेलिब्रेशन करण्यास सुरवात केली आहे.