1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

ज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे निधन

Amita Udgata passes away
Amita Udgata
टेलिव्हिजनच्या विविध  मालिकांमधून प्रसिधी मिळालेल्या  ज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे निधन झाले. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेत ‘बुआ’ची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या अमिता यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं होतं. पण, फुफ्फुसं निकामी झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.
 
अद्गाता यांनी आजवर बऱ्याच मालिकांतून उल्लेखनीय भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ‘प्रतिज्ञा’ या मालिकेतील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. या मालिकेत त्यांनी रंगवलेली ‘दादी’ची भूमिका बरीच प्रकाशझोतात आली होती. त्याशिवाय त्यांनी ‘डोली अरमानो की’, ‘बाजीगर’मध्येही उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. १९६५-६६ मध्ये त्यांनी रंगभूमीवर काम करत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.