बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

बिग बींनी शाहरुखकडून दहा लाख रुपये घेण्यास दिला नकार

कभी खुशी कभी गम’ आणि ‘मोहोब्बते’ या चित्रपटांतून बिग बी आणि शाहरुख खान यांनी स्क्रिन शेअर केली होती. या दोन्ही चित्रपटांनंतर या दोन्ही अभिनेत्यांमध्ये एक खास आणि आदराचं असं नातं निर्माण झालं. याच नात्याखातर बिग बींनी शाहरुखकडून दहा लाख रुपये घेण्यास नकार दिला होता.

शाहरुखच्याच निर्मिती संस्थेअंतर्गत म्हणजेच रेड चिलीज या बॅनरअंतर्गत साकारण्यात आलेल्या ‘पहेली’ या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी पाहुण्या कलाराची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना निर्मिती संस्थेकडून १० लाख रुपयांचा धनादेशही देण्यात आला होता. पण, शाहरुख सोबतची आपली मैत्री आणि त्याच्यासोबतचं खास नातं लक्षात घेत बिग बींनी ही रक्कम घेण्यास नकार दिला.