रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मे 2020 (15:53 IST)

'बंटी और बबली' चे 15 वर्षे पूर्ण झाल्यावर बिग बी यांनी मुलगा आणि सून यांच्यासह एक फोटो शेअर केला, तसेच हा मेसेज ही लिहिला

मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा बंटी और बबली या चित्रपटाच्या प्रदर्शनाला 15 वर्षे झाली आहेत. दिग्दर्शक शाद अली यांनी 2005 साली प्रदर्शित केलेल्या या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्यासह अमिताभ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या व्यतिरिक्त ऐश्वर्याने बिग बी आणि अभिषेकसोबत चित्रपटाच्या लोकप्रिय गाण्यातील कजरारेमध्ये एक जबरदस्त परफॉर्मेंस दिला होता. चित्रपटाची 15 वर्षे पूर्ण झाल्यावर बिग बीने प्रथमच मुलगा अभिषेक बच्चनसोबत मोठ्या पडद्यावर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. 
 
बिग बीने चित्रपटाचे पोस्टर आणि अभिषेक-ऐश्वर्यासोबत 'स्टेज शो' फोटो शेअर केला आहे. हे फोटो शेअर करताना बिग बीने लिहिले, '15 वर्षे .... 'बंटी आणि बबली. अभिषेक सोबत माझा पहिला चित्रपट. टीम खूप जोरदार होती. कजरारे  गाण्यावर यांनी जवळपास प्रत्येक ठिकाणी 6000 परफॉर्मेंस दिला होता. 
 
तसे, या चित्रपटा नंतर, बिग बी आणि अभिषेक यांनी 'सरकार', 'कभी अलविदा ना कहना' आणि 'पा' या चित्रपटात एकत्र काम केले आहे.