मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: कोलकाता , शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017 (08:32 IST)

अमिताभ बच्चन अपघातातून थोडक्‍यात बचावले

amitabh bachhan
अभिनेता अमिताभ बच्चन एका अपघातातून थोडक्‍यात बचावले आहेत. त्यांना कोलकाता विमानतळावर सोडण्यासाठी भाड्याने घेतलेल्या मर्सिडीज गाडीचे चाक निघाले. यासंबधीत पश्‍चिम बंगाल सरकारने संबंधित ट्रॅव्हल एजन्सीकडून स्पष्टीकरण मागवले आहे.
 
पश्‍चिम बंगाल सरकारच्या निमंत्रणावरून बच्चन शुक्रवारी कोलकाता आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलच्या उद्घाटनासाठी आले होते. शनिवारी सकाळी मुंबईला परतण्यासाठी विमानतळावर जात असताना हा अपघात घडला. एअरपोर्टला जाताना डफरीन रोडवर अचानक त्यांची गाडी डुगडुगायला लागली. त्यानंतर गाडीचे चाकही निघाले. गाडीच्या डाव्या बाजुच्या एअर सस्पेंशनमध्ये लीकेज असल्यामुळे गाडी एका बाजूला झुकली. कार एकीकडे झुकल्याचे लक्षात येताच खबरदारी म्हणून थांबवण्यात आली. पश्‍चिम बंगाल सरकारचे ज्येष्ठ मंत्रीसुद्धा बिग-बींच्या गाडीत होते. या घटनेनंतर बच्चन यांच्या गाडीच्या मागेच असणाऱ्या मंत्र्यांच्या गाडीतून बच्चन यांना विमानतळावर सोडण्यात आले.