शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 13 जानेवारी 2020 (12:54 IST)

एका कलाकाराने पूर्ण माहिती घेऊनच भाष्य करावं

An artist should comment only with full information
दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनू) बुरखेधारी हल्लेखोरांकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली होती. या घटने नंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी निषेध नोंदवला आहे. दरम्यान, या सर्व कलाकारांनंतर बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अभिनेता 'अजय देवगण' यानेदेखील आपले मत मांडले आहे.

अजय म्हणाला की, जेएनूमध्ये जो प्रकार घडला तो दुर्दैवी आहे तसेच अद्यापही कोणी काय केलं याबाबतची स्पष्ट माहिती आपल्या मिळू शकलेली नाही. त्यामुळे योग्य माहिती नसेल तर आगीत तेल ओतण्याचं काम करु नका. असा सल्ला त्यानं दिला आहे. तसेच, एक कलाकार म्हणून आपल्यावर  काही जबाबदारी असते. त्यात काही वक्तव्य करुन गोंधळ निर्माण करण्याची माझी इच्छा नाही. एका कलाकाराने पूर्ण माहिती घेऊनच भाष्य करावं, असंसुद्धा अजय म्हणाला आहे.