शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 एप्रिल 2021 (20:41 IST)

मी वडिलांच्या आठवणी सांगणे बंद केले’; इरफानचा मुलगा बाबीलने केला खुलासा

Babil Khan
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता इरफान खानचा 29 April 2020 ला कर्करोगाने निधन झाले. 
इरफान खानचा मुलगा बाबील  यांनी खुलासा केला की त्याने सोशल मीडियावर आपल्या दिवंगत वडिलांच्या आठवणी शेअर करणे का बंद केले. अनेकांनी त्याला संदेश दिला की तो स्वत: ची प्रसिद्धी करण्यासाठी त्याच्या वडिलांचा म्हणजेच इरफानचा वापर करीत आहे.
 
बाबील ने त्याच्या स्टोरी मध्ये असं लिहिले कि, “जेव्हा खरोखर मी बाबांच्या चाहत्यांमधील रिक्त जागा भरून काढण्यासाठी मनापासून आठवणी सांगत होतो तेव्हा मला अनेक जणांनी असा संदेश पाठवला कि तू तुझ्या वडिलांचा वापर तुझ्या स्वतःच्या फायद्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी करत आहेस. हे वाचून मला खरोखर त्रास होतो,”बाबील खान पुढे असं देखील म्हणाला कि, “मी प्रचंड गोंधळून गेलो आहे आणि योग्य वेळ आली कि मी पुन्हा एकदा आमचे फोटो शेअर करणे सुरु करेल.”