1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018 (15:27 IST)

भाग्यश्री झळकणार बॉलिवूडमध्ये

bhagyashree
मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या खूपच बीजी आहे. विविध मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या भाग्यश्रीकडे सध्या अनेक चित्रपट असून, लवकरच ती एका बॉलिवूड चित्रपटामधून लोकांसमोर येणार आहे. ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार असून, हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे, हिंदीत नशीब अजमावणाऱ्या मराठी तारकांच्या यादीत आता भाग्यश्रीचादेखील लवकरच समावेश होणार आहे. आगामी वर्षाप्रमाणे यंदाचे वर्षदेखील तिच्यासाठी खूप खास आहे. कारण, यावर्षी सलग तीन मराठी चित्रपटांद्वारे ती प्रेक्षकांसमोर आली आहे. त्यापैकी 'पाटील' आणि 'माझ्या बायकोचा प्रियकर' हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले असून, लवकरच तिचा 'विठ्ठल' हा सिनेमादेखील या वर्षाअखेरीस प्रदर्शित होत आहे. यात तिची एक विशिष्ट भूमिका आहे. 
 
गोंडस आणि गोजिऱ्या चेहऱ्याच्या भाग्यश्रीने आपल्या अभिनयाद्वारे मराठी प्रेक्षकांच्या मनात छाप पाडण्यास यश मिळवले आहे. त्यामुळे आता हिंदी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यास ती सज्ज झाली असून, मराठमोळ्या भाग्यश्रीची बॉलिवूड एंट्री पाहण्यासाठी तिचे चाहतेदेखील उत्सुक झाले असतील, हे निश्चित !