बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जानेवारी 2021 (16:42 IST)

‘आंखें 2' चित्रपटात खलनायक बनणार बिग बी

बॉलिवूड सुपरस्टार अतिाभ बच्चन यांच्या ‘आंखें' या चित्रपटाच्या सिक्वेलविषयी बरीच चर्चा झाली आहे. आतापर्यंत त्याच्या स्टारकास्टमध्ये बरेच बदल झाले आहेत. 
 
सुरुवातीला अनिल कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या समवेत निर्मात्यांना हा चित्रपट बनवायचा होता, पण नंतर अनिल कपूर आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या नावांची चर्चा होऊ लागली. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी सिद्धार्थ मल्होत्राकडे संपर्क साधला होता. चित्रपटाचा भाग 2 ची कहाणी अगदी नवीन असेल, पण पहिल्या भागाप्रमाणेच त्याला थरार मिळेल. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा एका अंध व्यक्तीची भूमिका साकारणार आहे, असे सांगितले जात आहे की अमिताभ या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसू शकतात. अतिताभ यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर शेवटच्या वेळी ते गुलाबो सीताबो या चित्रपटात दिसले होते. यात ते आयुष्मान खुरानासोबत मुख्य भूमिकेत होते.
 
त्याच वेळी सिद्धार्थ मल्होत्रा तारा सुतारियासोबत ‘मरजावां' चित्रपटात दिसला होता. तथापि, हा चित्रपट बॉक्स ‍‍ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्याचे दिग्दर्शन मिलाप झवेरीने केले होते.