शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 एप्रिल 2019 (10:55 IST)

बर्थ डे स्पेशल : लारा दत्ताने केले सर्वांना घायाळ

उत्तर प्रदेशाच्या गाझियाबाद शहरात 16 एप्रिल 1978 साली जन्मलेली लारा दत्ताने आपल्या किरअरची सुरुवात मॉडल म्हणून वर्ष 1995मध्ये केली. वर्ष 2000 मध्ये लारा दत्ता मिस यूनिवर्स म्हणून निवडून आली. लाराने बॉलीवूडमध्ये आपल्या करियरची सुरवात वर्ष 2003मध्ये प्रदर्शित चित्रपट  अंदाजाहून केले होते. या चित्रपटात लारा दत्ताच्या अपोजिट अक्षय कुमार होता. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते. या चित्रपटासाठी तिला  फिल्म फेअर द्वारे सर्वश्रेष्ठ डेब्यू अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
 
2004 मध्ये लाराचे चित्रपट मस्ती रिलीज झाले ज्याने बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळविले. या वर्षी रिलीज झालेले चित्रपट खाकीमध्ये लारा दत्ताने कैमियो केला होता. या चित्रपटात तिच्यावर चित्रवण्यात आलेले हे गीत 'ऐसा जादू डाला रे' प्रेक्षकांना बरेच आवडले होते.
वर्ष 2005मध्ये रिलीज झालेले बोनी कपूरचे चित्रपट 'नो इंट्री' लाराच्या करिअरचे एक अजून सुपरहिट चित्रपट साबीत झाले. 2007मध्ये डेविड धवन यांचा निर्दशनात तयार झालेले चित्रपट पार्टनर लारा दत्ताच्या करियरचे सुपरहिट चित्रपटांमधून एक आहे. या चित्रपटात सलमान खानसोबतच लारा दत्ताची जोडी लोकांना आवडली होती.
2009 मध्ये लारा दत्ताला शाहरुख खानसोबत 'बिल्लू बार्बर'मध्ये काम करण्याची संधी मिळाली, पण ह्या चित्रपटाने काही खास कमाल केले नाही. 2010 मध्ये लारा दत्ताचे सुपरहिट फिल्म 'हाऊसफुल' रिलीज झाले.  
2011 मध्ये लारा दत्ताने चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात आपले पाऊल ठेवले आणि चलो दिल्लीचा निर्माण देखील केला. हे चित्रपट तिकिट खिडकीवर हिट साबीत झाले. याच वर्षी लाराने प्रसिद्ध टेनिस खेळाडू महेश भूपतीसोबत लग्न केले. लारा सध्या चित्रपट इंडस्ट्रीत जास्त सक्रिय नाही आहे.
 
(सर्व फोटो- इंस्टाग्राम)