शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 (17:15 IST)

‘कोल्ड प्ले’ला हिरवा कंदील

येत्या १९ नोव्हेंबरला  आयोजित केलेल्या ब्रिटिश रॉक बँडच्या ‘कोल्ड प्ले’ला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र, भविष्यात याचिकाकर्त्यांची मागणी मान्य केली, तर मनोरंजन कर भरावा लागेल, असे स्पष्ट करत, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आयोजकांकडून तसे हमीपत्र घेण्याचे निर्देश दिले आहेत. कोल्ड प्ले’ला मनोरंजन कर लागू न करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला, सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे व अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. याप्रकरणात एमएमआरडीएनेही या कार्यक्रमासाठी मैदान देताना भाड्यात २५ टक्के सवलत दिली.एमएमआरडीएच्या याही निर्णयाला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे.मात्र, उच्च न्यायालयाने भाड्यात सवलत द्यायची की नाही, याचा अधिकार एमएआरडीएला असल्याने यात  हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट केलेआहे.