बुधवार, 17 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 11 जून 2017 (10:01 IST)

'दंगल' फेम झायरा अपघातातून थोडक्यात बचावली

zaira-wasim
आमिर खानच्या 'दंगल' सिनेमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली झायरा वसीम अपघातातून थोडक्यात बचावली आहे.  श्रीनगरमधील ही घटना आहे. शुक्रवारी रात्री झायरा आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेली असताना तिच्या कारला अपघात झाला. बुलेवार्ड रोडवर तिच्या कारला अपघात झाला. भरधाव वेगात असणा-या गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर गाडी फूटपाथवर चढली व रेलिंगला धडकली व नंतर कार दाल सरोवरात कोसळली. स्थानिकांनी  तातडीनं झायरा व तिच्या मित्रांना मदत करुन त्यांना सुखरुप बाहेर काढले.  सुदैवानं झायराला कोणत्याही प्रकारे दुखापत झालेली नाही. सोबत असलेला तिचा मित्र आरिफला किरकोळ दुखापत झाली.