testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आतापर्यंत 20 कोटींहून अधिक जणांनी ‘धीरे धीरे’ चा व्हिडीओ पाहिला

honey singh
Last Modified बुधवार, 15 फेब्रुवारी 2017 (16:51 IST)
बॉलिवूड रॅपर हनी सिंहचं सुपरहिट गाणं ‘धीरे धीरे’ने यू ट्यूबवर अक्षरश: धुमाकळ घातला आहे. आतापर्यंत 20 कोटींहून अधिक जणांनी ‘धीरे धीरे’ गाण्याचा व्हिडीओ पाहिला आहे. भारतीय संगीत क्षेत्रात एक विक्रम मानला जातो आहे. ‘आशिकी’ गाण्याचं रिमेक व्हर्जन म्हणजे ‘धीरे धीरे’ हे गाणं आहे. बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन आणि अभिनेत्री सोनम कपूर यांच्यावर हे गाणं चित्रित झालं आहे. शिवाय, गाण्याच्या व्हिडीओमध्ये काही ठिकाणी हनी सिंहने रॅपही केला आहे. त्यामुळे गाणं ऐकण्यासोबत पाहण्याची मजाही चाहते लुटत आहेत.यू ट्यूबवर 20 कोटी व्ह्यूज मिळाल्याने हे गाणं टॉप ट्रेण्डमध्येही आले आहे. यआधी हनी सिंहचे ‘ब्ल्यू आईस’, ‘देसी कलाकार’, ‘अंग्रेजी बिट’ यांसारखी गाणीही सुपरहिट झाली आहे.


यावर अधिक वाचा :