मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018 (09:23 IST)

दस का दम च्या शेवटच्या भागात शाहरुख, राणी मुखर्जी

दस का दम कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या कार्यक्रमाचा शेवटचा भाग हा दमदार असणार आहे. या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात प्रेक्षकांना बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांना पाहायला मिळणार आहे. 
 
शाहरुख खान, सलमान खान आणि राणी मुखर्जी यांची मुख्य भूमिका असलेला कुछ कुछ होता है हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाच्या वेळेच्या अनेक आठवणी या तिघांनी या कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थितांना सांगितल्या. यांच्यासोबत आपल्याला सुनील ग्रोव्हर दिसणार आहे.आपल्या खास शैलीत तो प्रेक्षकांना हसवणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या अवतरात आणि सर्वांच्या लाडक्या रिंकू भाभीच्या रूपात या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात तो दिसणार आहे.