गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 नोव्हेंबर 2023 (22:24 IST)

प्रकाश राज यांना इडीची नोटीस

ED notice to Prakash Raj मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने दक्षिण चित्रपट अभिनेते प्रकाश राज यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. तामिळनाडूतील एका ज्वेलरी फर्मच्या पॉन्झी स्कीम प्रकरणात ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकरणी तपास यंत्रणेने 20 नोव्हेंबर रोजी प्रणव ज्वेलर्सच्या जागेवर छापा टाकला होता. तपास यंत्रणेने तेथून 20 लाख रुपये आणि 11.60 किलोचे दागिने जप्त केले आहेत. तपास यंत्रणेला प्रकाश राज यांच्याकडून जाणून घ्यायचे आहे की ते या कंपनीशी कसे जोडले गेले. तसेच पॉन्झी स्कीम चालवून लोकांची 100 कोटींची फसवणूक करणाऱ्या कंपनीबद्दल त्यांच्याकडे किती माहिती आहे?
 
तामिळनाडू पोलिसांच्या EOW मध्ये नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मेसर्स प्रणव ज्वेलर्सविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. सोन्यात गुंतवणूक करून त्याबदल्यात चांगला नफा देण्याच्या नावाखाली कंपनीवर 100 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. जेव्हा लोकांना पैसे मिळाले नाहीत, तेव्हा त्यांची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली, त्यानंतर एजन्सीनेही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास सुरू केला.