मराठमोळ्या रागिणीच्या ह्या गाण्यावर थिरकतोय राजस्थान! Video
भारतीय विवाह म्हंटला तर त्यात मेहंदी, संगीत, हळद असे नानाविध समारंभ येतातच,आणि या सर्व समारंभात रंग भरण्याचे काम त्या भागातील प्रादेशीक गाणी करतात. शिवाय, डेस्टीनेशन वेडींग म्हंटलं तर राजस्थान आलंच, आणि त्या ओघाने राजस्थानी संगीतसुध्दा! राजस्थानी संगीताचा हा दर्जा मराठमोळी गायिका रागिणी कवठेकर ने ओळखत एक सुंदर राजस्थानी गीत आपल्यासमोर सादर केलं आहे. 'हलदी लागन लागे...' असं त्या गाण्याचं नाव असून डॉनी अँड रागिणी बँडने या रॉयल गाण्याची रचना केली. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सादर झालेले हे गाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या राजस्थानी हळदी गाण्याचे म्युझिक प्रोडक्शन, मिक्सिंग आणि मास्टरिंग डॉनी हजारिका यांनी केले आहे.
सुरेश जाजू हे या गाण्याचे सहनिर्माते असून, हे गाणे रीजेंट स्टुडिओ, जोधपूर येथे रेकॉर्ड करण्यात आले आहे, तसेच ते गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपूरमध्ये शूट करण्यात आले आहे. रागिणी कवठेकर हिने आपल्या सुरेल आवाजा बरोबरच ह्यात राजस्थानी नृत्य सादर केले आहे, तिच्यासोबत राजस्थानी कलाकार कुमार गौतम दिसून येतो. या गाण्याचे बोल आणि कोरिओग्राफी ज्योती झा यांनी केलं आहे.
रागिणी ने यापूर्वी अनेक प्रादेशिक गाण्यांचे सादरीकरण केलं आहे, मुळची ठाणेकर असलेली रागिणी मराठी प्रेक्षकांसाठी लवकरच एक मराठी गाणे घेऊन येणार आहे. नुकतच तिचं साऊथ मध्ये प्रसिद्ध असलेलं 'ओ अंटवा' गाण्याचं मराठी फिमेल व्हर्जन भरपूर गाजलं आहे.