शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: चेन्नई , सोमवार, 12 डिसेंबर 2016 (11:40 IST)

कूली शिवाजी राव बनला रजनीकांत, नरेंद्र मोदी यांनी दिली वाढदिवसाची शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळ चित्रपटांचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या 66व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिनंदन केले.  सुपरस्‍टार रजनीकांत 12 डिसेंबराला 66 वर्षाचे झाले आहे. त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1950मध्ये बंगळूर येथे झाला होता. 
 
मोदींनी ट्विट केले, 'हॅपी बर्थडे सुपरस्टार रजनी. आम्ही तुमच्या उत्तम आरोग्यासोबत दीर्घायू होण्याची कामना करत आहो.'  
 
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांचा मागच्या सोमवारी निधन झाल्यानंतर रजनीकांताने आपल्या चाहत्यांना त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा सल्ला आधीच दिला आहे. तामिळनाडू सरकारने दिवंगत नेत्याच्या सन्मानात सात दिवसीय शोकची   घोषणा केली आहे.    
 
रजनी यांचे आई वडिलांनी त्यांचे नाव शिवाजी राव गायकवाड ठेवले होते, पण चित्रपटात त्यांचे नाव रजनीकांत म्हणूज ओळखण्यात आले. त्यांचे वडील रामोजी राव गायकवाड हवालादार होते. आई जिजाबाईच्या मृत्यूनंतर चार भाऊ-बहिणींमध्ये सर्वात लहान रजनीकांताला लक्षात आले की घराची परिस्थिती काही चांगली नाही आहे तर ते कुटुंबीयांसाठी मदत म्हणून कूलीचे काम करू लागले.  
 
रजनीकांताची भेट एका नाटकाच्या दरम्यान चित्रपट दिग्दर्शक के. बालाचंदर यांच्याशी झाली होती, ज्यांनी त्यांना तमिळ चित्रपटात काम करण्याचा ऑफर दिला होता. या प्रकारे त्यांच्या करियरची सुरुवात बालाचंदर निर्देशित तमिळ चित्रपट 'अपूर्वा रागंगाल' (1975)ने झाली, ज्यात ते खलनायक बनले होते. ही भूमिका तशी तर लहान होती, पण त्यांच्या कामाची फार प्रशंसा झाली. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.