testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ऋतिक सुझैन साथ साथ

hrithik wife
Last Modified मंगळवार, 5 सप्टेंबर 2017 (16:38 IST)

अभिनेता ऋतिक रोशन आणि कंगना राणावत यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या वादात पहिल्यापासून ऋतिक रोशनच्या पाठिशी राहिलेली त्याची पत्नी सुझैन याकाळातही त्याच्या सोबत आहे. याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा आले आहे. सुझैनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ऋतिकसोबतचा एक फोटो शेअर करून हम साथ साथ है...! असे दाखवून दिले आहे.


कंगनाच्या काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्यातील वादाला पुन्हा फोडणी मिळाली होती. त्यामुळेच सुझैनने हा फोटो शेअर केल्याचे दिसत आहे. ऋतिक आणि सुझैनचा घटस्फोट झाला असला, तरी ते दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. अनेक सेलिब्रिटिंच्या पार्टीजमध्ये त्यांनी एकत्र हजेरी लावली आहे.यावर अधिक वाचा :