शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 मे 2018 (16:03 IST)

इरफान खान बोलला, सोशल मीडियाच्या माध्यमातून

irrfan khan

अभिनेता इरफान खान जवळपास दोन महिन्यांनतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आला आहे. ‘कारवाँ’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने इरफानने एक फोटो पोस्ट केला असून काही सुरेख ओळी त्या फोटोसोबत लिहिल्या आहेत. ”कोणत्याही गोष्टीच्या सुरुवातीच्या वेळी असणारी निरागसता विकत घेता येत नाही…दलकर आणि मिथिला या ‘कारवाँ’शी जोडले गेले आहेत… त्याबद्दल त्यांचे आभार. सध्या दोन ‘कारवाँ’ सुरु आहेत, एक म्हणजे मी आणि दुसरा म्हणजे चित्रपट”, असं तो या पोस्टमधून म्हणाला आहे.

वेब विश्वात लोकप्रियतेच्या शिखरावर असणारी अभिनेत्री मिथिली पालकर या चित्रपटातून मल्याळम सुपरस्टार दलकर सलमानसोबत झळकणार आहे. १० ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.