शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

याला म्हणतात नशीब, आता थेट बॉलिवूड एन्ट्री

नृत्यामुळेरातोरात स्टार झालेल्या मध्य प्रदेशच्या गोविंदा काकांचं नशीब पालटलं आहे. डान्सिंग स्टार झालेले संजीव श्रीवास्तव सध्या मुंबईत दाखल झाले असून त्यांना बॉलिवूडची ऑफर मिळाल्याच समजत. 
 
दोन दिवसांपूर्वी श्रीवास्तव मुंबईला आले होते. मुंबईला आल्यानंतर ते अभिनेता सुनील शेट्टीला भेटले आणि त्यांच्यात काही बोलणंही झालं. ही भेट एका आगामी चित्रपटासंबंधी असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याखेरीज त्यांना विविध रियालिटी शोजच्याही ऑफर्स येत आहेत. तसंच काही चित्रपट कलाकारही संजीव यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याची चर्चा आहे. संजीव यांच्या नृत्यावर बॉलिवूडही फिदा झालं असून अर्जुन कपूर, अनुष्का शर्मासह अभिनेता गोविंदानेही त्यांच्या नृत्याची प्रशंसा केली आहे. त्यांच्या या नृत्यकौशल्यामुळेच त्यांच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले आहेत.