मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (17:14 IST)

अभिनय नव्हे तर या क्षेत्रात करायचे होते करिअर

career in acting
दक्षिणेकडील सर्वात स्टायलिस्ट अभिनेता म्हणून अल्लू अर्जुन ओळखला जातो. अल्लू अर्जुनने त्याच्या अभिनाच्या जोरावर अनेकांच्या मनात घर केले आहे. पण अभिनाच्या दुनियेत पदार्पण करण्यापूर्वी अल्लू अर्जुनला वेगळ्याच क्षेत्रामध्ये करिअर करायचे होते. खुद्द अल्लू अर्जुननेच हा खुलासा केला आहे.
 
नुकतंच अल्लू अर्जुनने एका लोकप्रिय शोमध्ये हजेरी लावली. दरम्यान त्याने त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टींचा खुलासा केला. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्याला पियानो आणि मार्शल आर्ट शिक्षक व्हायचे होते. कधी-कधी त्याला N-S मध्ये काम करण्याची इच्छा व्हायची तर कधी अ‍ॅनिमेटर आणि विजुअल्स इफेक्ट्‌स सुपरवायझर व्हायचे होते. जवळपास 15 वर्षांपूर्वी अल्लू अर्जुनने टॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. आज तो दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता ठरला आहे. त्याने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.