गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 ऑक्टोबर 2022 (17:03 IST)

'Jai Shri Ram' song अक्षय कुमारच्या 'राम सेतू' चित्रपटातील 'जय श्री राम' गाणे झाले रिलीज

akshay kumar
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'राम सेतू' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटातील 'जय श्री राम' हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे दिवाळी अँथम म्हणून रिलीज करण्यात आले आहे.
 
 हे गाणे विक्रम माँट्रोजने गायले आहे. या गाण्याचे बोल शेखर अस्तित्व यांनी लिहिले आहेत. हे गाणे उच्च उर्जा देणारे भक्तीगीत आहे. भगवान रामाची प्रतिमा लक्षात घेऊन गाण्याचे बोल लिहिले गेले आहेत. या दिवाळीत राम भक्तांसाठी हे गाणे एखाद्या मेजवानीपेक्षा कमी नाही.
 

हे गाणे रिलीज होताच यूट्यूबवर हिट झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षयसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'राम सेतू' हा चित्रपट 25 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
Edited by : Smita Joshi